बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व सध्या मोठ्या चर्चेत आहे. हे पहिले असे पर्व जे पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. पहिल्या दिवसापासूनच हे पर्व गाजताना दिसत आहे. बिग बॉसच्या या पर्वात एकूण १६ स्पर्धक सहभागी झाले असून, अभिनय क्षेत्रातील कलाकारांबरोबरच यूट्यूबवरील प्रसिद्ध चेहरेदेखील दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यामधील भांडण हा विषय फक्त बिग बॉसच्या घरापर्यंत मर्यादित न राहता, त्याची चर्चा बाहेरदेखील होऊ लागली आहे. अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्याशी वाद घातल्याने निक्की तांबोळीवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. मात्र, आता प्रसिद्ध युट्यूबर अंकिता वालावलकर ( Ankita Prabhu Walawalkar ) ही चर्चेत आली आहे.

काय म्हणाली अंकिता?

‘कलर्स मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता रडताना दिसत आहे. रडत रडत ती आर्याला सांगताना दिसते की, मला भांडी घासण्याची भीती वाटते. मी भांडी घासत नाही. पण तेसुद्धा मी करत आहे. माझ्या घरच्यांनादेखील माहित आहे की, मी भांडी घासत नाही. पण माझ्या ज्या कमजोरी आहेत, त्यावर मी काम करेन. त्यावर आर्या तिला म्हणते की, मी भांडी घासते. त्यावर अंकिता तिला मी करेन असे म्हणताना दिसत आहे.

याबरोबरच, ती आर्याला भांडणापासून दूर असा सल्लादेखील देत आहे. जिथे तुला वाटतं की भांडणं होणार आहेत, तिथून लांब जायचं, भांडण नाही करायचं. तू प्रयत्न कर, तुझं वय आहे. तू मुद्दे मांडत आहेस, बरोबर आहे. आपल्या हक्कासाठी आपण लढलं पाहिजे. पण समोरचा व्यक्ती हिंसक होत असेल तर आपण तिथे थांबायचं नाही. शांत राहायचं, असा सल्ला तिने आर्याला दिला आहे.

हेही वाचा: Bigg Boss OTT 3 Grand Finale Live Updates: कोण जिंकणार ‘बिग बॉस ओटीटी ३’ चा विजेतेपद?

अंकिता ही सोशल मीडियावर कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे. तिची लोकप्रियता मोठी आहे. आता बिग बॉसच्या घरात राहून प्रेक्षकांची मने जिंकण्यात अंकिता यशस्वी होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, दरम्यान, निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांचे भांडण कोणते वळण घेणार आणि आठवड्याच्या शेवटी रितेश देशमुख कोणाची शाळा घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याआधीच्या चार पर्वांचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते. पहिल्यांदाच रितेश देशमुख बिग बॉसचे सूत्रसंचालन करीत असल्याने या नवीन भूमिकेत तो प्रेक्षकांचे मन जिंकणार का? हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 5 ankita prabhu walawalkar have phobia of cleaning utensils crying in house nsp