सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्फीच्या कपड्यांवर अनेकदा आक्षेप घेण्यात आला आहे. आता अभिनेता फैजान अन्सारीने उर्फीबाबत धक्कादायक वक्तव्य केलं आहे. उर्फी जावेद तृतीयपंथी असल्याचा दावा अन्सारीने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, अन्सारीने उर्फी जावेद तृतीयपंथी असल्याचं म्हटलं आहे. “उर्फी जावेद मुलगी नसून एक तृतीयपंथी आहे. ती ज्या पद्धतीने बोलते. जसे कपडे घालते, यावरुन हे सिद्ध होतं. ती तृतीयपंथी असल्याचे काही पुरावे माझ्याकडे आहेत. तुम्ही तिच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास ती मुलगी नसून तृतीयपंथी असल्याचं तुमच्या लक्षात येईल,” असं अन्सारीने म्हटलं आहे.

हेही वाचा>> “माझी मुलगी मुस्लीम धर्माचे पालन करते” नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाची पोस्ट चर्चेत, म्हणाली “मी एक ब्राह्मण मुलगी…”

हेही वाचा>> “त्यांना महात्मा गांधींच्या…”, एकेरी उल्लेख करत शरद पोंक्षेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले, “वीर सावरकर अन्…”

तृतीयपंथी असल्याचं उर्फीने स्वत: मान्य करावं अन्यथा तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असून पुरावे न्यायालयात सादर करणार असल्याचंही अन्सारी म्हणाला आहे. याआधी अन्सारीने उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता. याबाबत त्याने उर्फीविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. “उर्फी जावेद मुंबईचं वातावरण दुषित करत आहे. तिच्या चित्रविचित्र कपड्यांमुळे समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत”, असं अन्सारी म्हणाला होता.

हेही वाचा>> Big Bang Theory: माधुरी दीक्षितला “वेश्या” म्हणणाऱ्या अभिनेत्याला जया बच्चन यांनी सुनावलं, म्हणाल्या “त्याला..”

चित्रविचित्र कपडे घालून उर्फी जावेद सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असते. कधी वायरपासून तर कधी टॉयलेट पेपरपासून बनवलेला ड्रेस परिधान करत उर्फी कायमच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. अन्सारीआधी उर्फीच्या अतरंगी कपड्यांवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही आक्षेप घेत तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Faizan ansari shocking revelation about urfi javed said she is transgender kak
Show comments