विशाखा सुभेदार या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यांच्या विनोदाचे लाखो चाहते आहेत. आतापर्यंत अनेक कार्यक्रमांमधून विनोदी स्किट करत त्यांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रामधील त्यांच्या स्किटला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. विनोदी अभिनेत्री म्हणून विशाखा यांची ओळख आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी त्यांना मिळालेल्या विनोदी अभिनेत्रीच्या टॅगवर भाष्य केलं आहे.
हेही वाचा- ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का? करायची मॅकडोनाल्डमध्ये काम
विशाखा म्हणाल्या, “जेव्हा मला विनोदी अभिनेत्रीचं लेबल लागत होतं तेव्हा वाटायचं की आता काहीतरी वेगळं करायला हवे. या स्किट फॉरमॅटमुळे मी विनोदी कलाकार असले तरी मला खूप वेगवेगळ्या भूमिका करायला मिळाल्या. त्यामुळे मला सातत्याने तेच तेच करतोय असं कधीच वाटलं नाही. मला भीती वाटत असली तरी मला माहिती होतं की मला यातून रोज काहीतरी वेगळं करायचं आहे. पण एखाद्या प्रवाहात गेल्यानंतर त्या प्रवाहाच्या विरोधात यायचं असेल तर खूप आर्थिक, मानसिक, आणि शाररिक बळ लागतं. ते आल्यानंतरच आपण निर्णय घेऊ शकतो.”
काही दिवसांपूर्वी विशाखा यांनी हास्यजत्रा सोडण्यामागचं कारणही सांगितलं होतं. विशाखा म्हणाल्या“मी हास्यचत्रा सोडण्याचं तेच मुख्य कारण होतं. त्यात कोणी माझा अपमान करत आहे, मला योग्य वागणूक देत नाहीये अशातला काहीही भाग नाही. हास्यजत्रेत माझे खूप लाड झाले, मला फटकारलंही गेलं, मला टोमणेही खावे लागले. मी हास्यजत्रा म्हणूनच सोडलं कारण मी कुठे आहे हे मला तपासून पाहायचं होतं.” असं त्या म्हणाल्या.
हेही वाचा- ‘शुभविवाह’ फेम मधुरा देशपांडेने सांगितला नवऱ्याबरोबरच्या पहिल्या डेटचा भन्नाट किस्सा; म्हणाली….
विशाखा यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर गेल्या काही दिवसांपासून त्या ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकात व्यस्त आहे. तसेच त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेत काम करत आहे. या मालिकेत मधुरा देशपांडे, यशोमन आपटे, विशाखा सुभेदार, कुंजिका काळविंट, अभिजीत श्वेतचंद्र हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे.