जुही परमार ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. ती नुकतीच ‘ये मेरी फॅमिली सीझन २’ मध्ये दिसली होती. जुहीने दोन दशकांपूर्वी लोकप्रिय टेलिव्हिजन शो ‘कुमकुम’मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. या भूमिकेने तिला खूप लोकप्रियता मिळवून दिली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जुहीने टीव्ही मालिकांमध्ये काम करतानाचे अनुभव शेअर केले. ती बऱ्याचदा ३० तास नॉन-स्टॉप काम करायची, असा खुलासा तिने केला आहे.
हेही वाचा – “माझ्याच बॉयफ्रेंडने…”, अक्षय कुमारने ट्विंकलला प्रपोज केल्यावर गर्लफ्रेंड शिल्पा शेट्टीने केले होते आरोप
जुही परमार म्हणाली, “आम्ही तेव्हा खूप काम केलं, आता तेवढं सगळं करायला कसं जमलं, याचं मलाच आश्चर्य वाटतं. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला डेली सोप हा प्रकार नवीन होता. त्यामुळे ते सगळं कसं हाताळायचं, हे निर्मात्यांनाही माहीत नव्हतं. एका आठवड्यात इतके एपिसोड ऑन-एअर जायचे, ते वेळेत जावे यासाठी खूप काम करावं लागायचं आणि कामाचे तास वाढायचे. हे टेलिव्हिजनचं स्वरूप होतं. त्यामुळे मागणीनुसार पुरवठा करावा लागायचा. जे गरजेनुसार जास्त तास काम करू शकत नाहीत, त्यांनी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करू नये. करायचं ठरवलं असेल तर त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार असलं पाहिजे.”
हेही वाचा – “त्याने मला…”, गरोदर असल्याचं कळताच जेव्हा नीना गुप्तांनी विवियन रिचर्ड्सना केला होता फोन
जुही परमार शेवटी म्हणाली की ती टेलिव्हिजनकडे कधीही तुच्छतेने पाहणार नाही. कारण ती जे आहे ते टेलिव्हिजनमुळे आहे. “मी इथे कोणाचंही नाव घेत नाही किंवा कोणाचाही उल्लेख करत नाही, मी इथे फक्त माझ्याबद्दल बोलत आहे. माझ्या मते, मी टेलिव्हिजनचा खूप आदर करते. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये डेडलाइनसह, कोणतीही तयारी न करता, सतत काम करणे, काम करण्याची तयारी असणे खूप आनंददायी आहे,” असंही जुही म्हणाली.
मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.