‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत दीपा हे पात्र साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे ही सतत चर्चेत असते. रेश्मा शिंदे ही ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली. नुकतंच रेश्माने तिचा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिची मैत्रीण आणि अभिनेत्री पूजा बिरारीने तिला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
पूजा बिरारीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रेश्मा शिंदे दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना पूजाने रेश्माला शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : “मला लोक होम-ब्रेकर म्हणतात, पण…”; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या पहिल्या पत्नीबद्दल प्रिया बेर्डेंचे स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या “तेव्हा प्रेमात…”
तू अशीच कायमच जोरजोरात हसत राहा आणि मी अशी इच्छा व्यक्त करते की मी तिथे कायम तुझ्यासोबत असावी, जेणेकरुन मला ते शूट करता येईल. खूप सारं प्रेम गं ढमे. God Bless You. आईला जरा कमी त्रास दे आणि मला सुद्धा. बाकी काय मी चिडलीय तुझ्यावर हे कायम आहेच, असे पूजा बिरारीने म्हटले आहे.
दरम्यान ‘रंग माझा वेगळा’ फेम दिपा म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि ‘स्वाभिमान’ फेम पल्लवी म्हणजे पूजा बिरारी या दोघीही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या दोघीही अनेकदा विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.