कलाकारांचं लाइफस्टाइल, त्यांच्या महागड्या वस्तू, गाड्या, घर याची नेहमीच चर्चा रंगताना दिसते. शिवाय चाहत्यांनाही आपल्या आवडत्या कलाकारांबाबत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात अधिक रस असतो. कलाकारांची आलिशान घरं व त्यांच्या घरांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आता अशाच एका अभिनेत्रीच्या घराची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – सैफ अली खानचं लग्न झाल्यावर लेकापासून विभक्त राहू लागल्या शर्मिला टागोर, म्हणाल्या, “आईला गृहित धरलं जातं कारण…”

अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या तिचा स्वतःचा वेळ एण्जॉय करताना दिसत आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये ती शेवटची दिसली. या मालिकेमधील तिच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. प्रार्थनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे घरातील काही व्हिडीओ शेअर केले आहेत.

या व्हिडीओमध्ये प्रार्थनाच्या घराची झलक पाहायला मिळत आहे. प्रार्थनाच्या घराचं आकर्षक इंटेरियर, मोठा फिश टँक तसेच घरातील विविध वस्तू लक्षवेधी आहेत. शिवाय तिने घरासाठी पसंत केलेला रंगही अगदी उठून दिसत आहे. घराच्या आलियाशान हॉललाच मोठी खिडकी आहे.

प्रार्थनाच्या घराच्या हॉलमधील खिडकीमधून दिसणारा मुंबईचा अथांग समुद्र आणि शांतता खरंच हवीहवीशी वाटणारी आहे. मुंबईच्या समुद्रकिनारी आलिशान घर असावं असं बहुदा अनेकांचं स्वप्न असावं. पण प्रार्थनाने तिचं हे स्वप्न स्वतःच्या हिंमतीवर पूर्ण केलं आहे. घरातील हॉलच्या खिडकीमध्ये बऱ्याचदा ती बसते. यादरम्यानचे फोटो व व्हिडीओही शेअर करते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress prarthana behere home at mumbai sea face video and photos goes viral on social media see details kmd