Premium

“आता धरती मातेचं काय होईल?” वजनावरून डिवचणाऱ्यांना विशाखा सुभेदारचं सडेतोड उत्तर म्हणाली, “आहे वजनदार पण…”

अभिनेत्री विशाखा सुभेदार नेमकं काय म्हणाली? जाणून घ्या…

marathi actress Vishakha Subhedar
अभिनेत्री विशाखा सुभेदार नेमकं काय म्हणाली? जाणून घ्या… (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘फुबाईफू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून अभिनेत्री विशाखा सुभेदार घराघरात पोहोचली. विनोदाच्या अचूक टायमिंगच्या जोरावर विशाखाने प्रेक्षकांची मनं जिंकली. विशाखा फक्त विनोदी भूमिका नाही तर खलनायिकेची भूमिका देखील तितक्याच उत्तम रित्या निभावते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘शुभविवाह’ मालिकेतील तिची रागिणीची भूमिका. ज्याप्रमाणे मालिकेतील मुख्य केंद्रबिंदू असलेल्या भूमिकेवर प्रेम केलं जात त्याप्रमाणे विशाखा सुभेदारच्या खलनायिकेच्या या भूमिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. पण अशात विशाखाची एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टमधून तिनं वजनावरून डिवचणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – स्वप्नील जोशीचा ‘या’ अभिनेत्रीबरोबर लंडनच्या ब्रीजवर रोमान्स; व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री विशाखा सुभेदार ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. कधी कविता, कधी डान्स चाहत्यांसाठी सादर करत असते. पण तिच्या कोणत्या ना कोणत्या व्हिडीओवर वजनावरून कमेंट केली जाते. ‘हळू डान्स कर मागची भिंत पाडशील’, ‘हळू डान्स कर पृथ्वी पडेल’, अशा कमेंट केल्या जातात. पण अशा कमेंट करणाऱ्यांना आता विशाखाने चांगलंच उत्तर दिलं आहे.

हेही वाचा – “अभ्यासक्रम नाही, इयत्ता नाही…”; ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरच्या मुलीची शाळा आहे फारच खास

‘मला प्रितीच्या झुल्यात झुलवा’ या गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर करत विशाखाने त्याला जबरदस्त कॅप्शन दिलं आहे. तिनं लिहीलं आहे की, “मी लाडाची….! आता धरती मातेच काय होईल? भूकंप होईल या सगळ्या कमेंट ठेवा तुमच्यापाशी…हो…आहे वजनदार पण मला पण एन्जॉय करू द्या की, तुमचं रंजन करत आलेच आहे की मी…मज्जेत राहू द्या आणि तुम्ही पण मज्जेत रहा…”

हेही वाचा – “माझा बुंगरी…”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचा सेटवरील पाहा खास मित्र

हेही वाचा – Video: किरण मानेंचा ‘चलेया’ गाण्यावर जबरदस्त डान्स; व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “लाडक्या…”

विशाखाच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. एका नेटकरीनं लिहीलं आहे की, “एक नंबर… कॅप्शनची खरच काहीच गरज नाही आणि जे तब्येतीबद्दल बोलतात त्यांना यापैकी एक जरी अदा, डान्स, एक्स्प्रेशन जमतात का? हा प्रश्न स्वतःला विचारावा. मग जज करा, नाव ठेवा म्हणावं.” तर दुसऱ्या नेटकरीनं लिहीलं आहे की, “बाकीचे काय म्हणतात हे विसरून जा. स्वतः एन्जॉय करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तर मस्तच डान्स करता.”

हेही वाचा – “अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले…”; शशांक केतकरवर एका ज्येष्ठ अभिनेत्यानं केली होती टीका, वाचा किस्सा

दरम्यान, विशाखाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं विनोदी कार्यक्रम आणि मालिकांव्यतिरिक्त बरेच चित्रपट देखील केले आहेत. ‘फक्त लढ म्‍हणा’ (२०११), ‘४ इडियट्स’ (२०१२) आणि ‘अरे आवाज कोनाचा’ (२०१३), ‘ये रे ये रे पैसा’ (२०१८) आणि ‘६६ सदाशिव’ (२०१९) अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actress vishakha subhedar answers to people those trolling on weight pps

First published on: 15-09-2023 at 20:13 IST
Next Story
नकारात्मक भूमिका असतानाही ‘प्रेमाची गोष्ट ‘मालिकेला होकार का दिला? अपूर्वा नेमळेकर म्हणाली, “बिग बॉसनंतर मी…”