scorecardresearch

Premium

Video: किरण मानेंचा ‘चलेया’ गाण्यावर जबरदस्त डान्स; व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “लाडक्या…”

अभिनेते किरण माने यांचा ऑनस्क्रीनवरील लेकीबरोबरचा डान्स पाहून चाहत्यांनी खऱ्या आयुष्यातल्या लेकीबरोबर व्हिडीओ शेअर करण्याची केली मागणी

marathi actor kiran mane
अभिनेते किरण माने यांचा ऑनस्क्रीनवरील लेकीबरोबर जबरदस्त डान्स

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बॉस ऑफिसवर छप्परफाड कमाई हा चित्रपट करत आहे. किंग खानचे कोट्यवधी चाहते या चित्रपटावर भरभरून प्रेम करत आहेत. कलाकार मंडळी देखील हा चित्रपट पाहून त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. असा एक शाहरुखचा जबरा फॅन म्हणजे अभिनेते किरण माने.

हेही वाचा – “अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले…”; शशांक केतकरवर एका ज्येष्ठ अभिनेत्यानं केली होती टीका, वाचा किस्सा

yulia navalnaya life challenges marathi news, alexei navalny wife marathi news, yulia navalnaya marathi news, russian opposition leader alexei navalny s wife yulia navalnaya
युलिया नवाल्नाया असण्याचे आव्हान
2 youth arrested for Killing elderly couple in thane
ठाण्यातील वृद्ध दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक; चोरीच्या उद्देशातून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज
do Vyaghrasana know its health benefits
Vyaghrasana Yoga : तासन् तास बसून काम करत असल्यामुळे पाठदुखी व कंबरदुखीचा त्रास वाढलाय? मग व्याघ्रासन योगा करा
17 year old stabbed to death by two minors
दोन मित्रांनी अल्पवयीन मुलाची चाकूने भोसकून केली हत्या

‘जवान’ प्रदर्शित झाल्यापासून किरण माने या चित्रपटासंबंधित सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत आहेत. शाहरुखविषयी आपल्या भावना व्यक्त करत आहेत. आता त्यांनी ‘जवान’ चित्रपटातील ‘चलेया’ या गाण्यावरचा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये, किरण माने ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतील चिंधी म्हणजे बालकलाकार अनन्या टेकवडे बरोबर ‘चलेया’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. किरण माने यांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहीलं आहे की, “लाडक्या लेकीचा हट्ट पुरवावा लागला. मला नाचता येत नसतानाबी नाचायला लागलं.”

हेही वाचा – “पडले, धडपडले, पुन्हा उठले…” ‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली…

हेही वाचा – “आम्ही मुर्ख आहोत, तुम्हाला मतदान करतोय”; ‘तुझेच मी गीत गात आहे’ फेम तेजस्विनी लोणारीचं सध्याच्या राजकारणावर परखड मत, म्हणाली…

ऑनस्क्रीनवरील लेकीबरोबरचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर किरण मानेंना आता खऱ्या आयुष्यातल्या लेकीबरोबरचा व्हिडीओ शेअर करण्यासाठी चाहते सांगत आहे. तसेच त्यांच्या या व्हिडीओतील डान्सचे चाहते कौतुक देखील करत आहेत.

हेही वाचा – दाक्षिणात्य सुपरस्टार अडकला लग्नबंधनात; ‘या’ अभिनेत्रीबरोबर घेतले सात फेरे

दरम्यान, किरण माने यांची ‘सिंधुताई माझी माई’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. या मालिकेतही त्यांनी वडिलांची भूमिका साकारली आहे. यापूर्वी त्यांनी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’मध्ये वडिलांची भूमिका साकारली होती; जी चांगलीच गाजली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actor kiran mane dance on shahrukh khan song chaleya from jawan pps

First published on: 15-09-2023 at 12:36 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×