Marathi Actress Reshma Shinde Birthday : ‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेचा विवाहसोहळा २९ नोव्हेंबरला थाटामाटात पार पडला. अभिनेत्रीच्या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील असंख्य कलाकार उपस्थित होते. याशिवाय ‘रंग माझा वेगळा’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील तिचे सहकलाकार सुद्धा रेश्माच्या लग्नाला आले होते. थाटामाटात लग्न पार पडल्यावर अभिनेत्री आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिच्या पतीने खास पोस्ट शेअर करत बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून रेश्मा शिंदेच्या ( Reshma Shinde ) लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा होती. अभिनेत्रीचं पहिलं केळवण पार पडल्यावर तिचा होणारा नवरा नेमका कोण आहे याबद्दल देखील तिचे चाहते अंदाज बांधत होते. अखेर हळदी समारंभादिवशी रेश्माने नवऱ्याचा चेहरा सर्वांसमोर रिव्हिल करत त्याचं नावंही जाहीर केलं. रेश्माच्या पतीचं नाव पवन असून तो कलाविश्वापासून दूर आहे.
हेही वाचा : शाहरुखच्या मुलांची नावं ठळक अक्षरात, तर मराठी कलाकारांना…; ‘ते’ पोस्टर पाहून सौरभ चौघुलेचा सवाल, म्हणाला…
रेश्मा आणि पवनचा विवाहसोहळा आधी पारंपरिक मराठी पद्धतीने आणि त्यानंतर दाक्षिणात्य पद्धतीने पार पडल्याचं अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवरून स्पष्ट होत आहे. आता लाडक्या बायकोच्या वाढदिवशी पवनने खास फोटो पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
राघवेंद्र स्वामींच्या मंदिरात दर्शन घेतानाचा फोटो पवनने शेअर केला आहे. “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ಹೆಂಡತಿ. देवाच्या आशीर्वाद कायम तुझ्या पाठिशी राहूदेत. प्रेम, आनंद, उत्तम आरोग्यासह तुझ्या आयुष्यात कायम भरभराट येऊदे.” अशी पोस्ट पवनने रेश्मासाठी लिहिली आहे. यामध्ये पवनने लिहिलेला कन्नड शब्द सर्वांचं लक्ष वेधून घेतो. या ‘ಹೆಂಡತಿ’ कन्नड शब्दाचा अर्थ पत्नी किंवा बायको असा होता.
हेही वाचा : रेश्मा शिंदेच्या वाढदिवशी पतीची खास पोस्ट! कन्नडमध्ये लिहिला ‘तो’ खास शब्द; म्हणाला, “प्रेम, आनंद…”
रेश्माच्या ( Reshma Shinde ) नवऱ्याने शेअर केलेल्या या पोस्टची सर्वत्र चर्चा होत आहे. देवदर्शन करताना हे जोडपं पारंपरिक लूकमध्ये पाहायला मिळतंय. दरम्यान, आज वाढदिवसानिमित्त रेश्मावर तिच्या चाहत्यांसह मराठी विश्वातील कलाकारांकडून शुभेच्छांदा वर्षाव करण्यात येत आहे. याशिवाय तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत जानकी ही प्रमुख भूमिका साकारत आहे.
© IE Online Media Services (P) Ltd