Zee Marathi Paaru Serial : ‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास’ या ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकांचा महासंगम नुकताच पार पडला. या सोहळ्यात अनुष्का आणि आदित्य यांचा साखरपुडा झाला होता. यावेळी सगळे किर्लोस्कर कुटुंबीय उपस्थित होते. मात्र, या सोहळ्याला आणखी एक व्यक्ती हजर होती ती म्हणजे दिशा. अनुष्काची लहान बहीण दिशा ही मालिकेची खलनायिका एवढे दिवस जेलमध्ये असल्याचा ट्रॅक चालू होता. मात्र, अचानक ती आदित्य आणि अनुष्काच्या साखरपुड्याला हजर होऊन आपल्या सख्ख्या बहिणीला सुद्धा धमकी देत असल्याचं पाहायला मिळालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पारू’ मालिकेत दिशाची भूमिका अभिनेत्री पूर्वा शिंदे साकारत आहे. पारूने दिशाचं कारस्थान उघडकीस आणून दिशा आणि प्रीतमचं लग्न मोडलेलं असतं. त्यामुळे बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मालिकेत अनुष्काने एन्ट्री घेतली होती. याबद्दल किर्लोस्कर कुटुंबीयांना काहीच माहिती नसतं. त्यामुळेच अनुष्का आणि आदित्यचं लग्न ठरतं. पण, आता पुन्हा एकदा नव्या जोमाने दिशा या मालिकेत येणार आहे. याचा खास पडद्यामागचा व्हिडीओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

साखरपुडा सोहळ्यात दिशा केवळ आपल्या बहिणीला भेटून निघून गेली होती. पण, आता ५ आलिशान गाड्या, ११ बॉडीगार्ड्स आणि वेस्टर्न लूक करून दिशा पुन्हा एकदा मालिकेत परतली आहे. ती थेट अहिल्यादेवी किर्लोस्कर यांचा ‘सासू मॉम’ म्हणत सामना करणार आहे. दिशाला पुन्हा एकदा पाहून सर्वांच्याच चेहऱ्यावरचा रंग उडाल्याचं पाहायला मिळतं.

दिशा किर्लोस्कर उद्योगसमूहाविरुद्ध प्रतिस्पर्धी कंपनी सुरू करते. ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाला मोठा धोका निर्माण होतो. अहिल्या चिंतेत आणि विचारात आहे की आदित्य या कठीण स्पर्धेला कसा सामोरा जाईल. तर, दुसरीकडे अनुष्का… पारू आणि आदित्यच्या नात्यातली माहिती गोळा करू लागते, पारूविरुद्ध काहीतरी सबळ पुरावा मिळवण्याचा प्रयत्न करते. पारू मात्र अनुष्काला तिच्याच पद्धतीने उत्तर देते. याशिवाय ‘पारू’ आता पुन्हा एकदा किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अँबेसेडर सुद्धा होणार आहे.

दरम्यान, आता ‘पारू’ मालिकेत अचानक दिशा आल्याने तिचा पुन्हा एकदा अहिल्यादेवी सामना कसा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi disha face off with ahilyadevi actress re enters the show shares bts video sva 00