गेल्या काही वर्षांपासून तरुणाईमध्ये परदेशी कलाकृतींची लोकप्रियता वाढत आहे. आजची युवा पिढी ही भारतीय कलाकृतींबरोबरच परदेशी कलाकृतीही मोठ्या प्रमाणात पाहते. अनेक परदेशी कलाकार आता भारतात प्रचंड लोकप्रिय आहेत. यातीलच एक अभिनेता म्हणजे बुराक डेनिझ.
बुराक डेनिझ हा तुर्कीश अभिनेता आहे. अनेक एक से बढकर एक मालिका, वेब सिरीज, चित्रपट यामध्ये त्याने काम केलं आहे. बुराक आता पहिल्यांदाच भारतात आला आहे. यावेळी त्याला शाहरुख खानची सिग्नेचर पोज देण्याचा मोह आवरला नाही.
तो पहिल्यांदाच भारतात आल्याने त्याचे चाहते खूप आनंदी झाले आहेत. भारतात त्याच्या चाहता वर्ग खूप मोठा आहे. बुराकचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. नुकताच तो एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाला होता. या कार्यक्रमात त्याने शाहरुख खानची सिग्नेचर पोजही दिली.
हेही वाचा : शाहरुख खानचा ‘कार’नामा! खरेदी केली नवी कोरी रोल्स रॉयस; किंमत वाचून व्हाल आवाक्
त्याने केलेला या शाहरुखच्या पोजवर त्याचे चाहते अक्षरशः फिदा झाले. याचबरोबर त्याच्या साधेपणाचं आणि नम्रपणाचंही नेटकरी कौतुक करत आहेत. या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करत नेटकरी बुराकचं कौतुक करत आहेत. आता त्याचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.