तमिळ चित्रपट आणि टीव्ही अभिनेता पवन सिंह याचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी या अभिनेत्याची प्राणज्योत मालवली आहे. पवनचा त्याच्याच घरी मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला.१८ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजता मुंबईतील राहत्या घरी त्याचे निधन झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेव्हा सर्वांसमोर रजनीकांत यांच्या तोंडावर थुंकल्या होत्या श्रीदेवी; काय घडलं होतं? वाचा

गेल्या काही महिन्यांपासून साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून कलाकारांच्या दुर्दैवी निधनाच्या बातम्या समोर येत आहे. नुकतंच कन्नड अभिनेते विजय राघवेंद्र यांच्या पत्नीचे हार्ट अटॅकने निधन झाले होते. त्यापूर्वी तमिळ अभिनेते मोहन ३१ जुलै रोजी रस्त्यावर मृतावस्थेत आढळले होते. एका तमिळ अभिनेत्रीच्या पत्नीचंही काही दिवसांपूर्वी हार्ट अटॅकने निधन झालं होतं. आता पवनच्या निधनाची बातमी समोर आली आहे.

“मी सिगारेट ओढत होतो अन्…”, सुबोध भावेने मंजिरीला रक्ताने लिहिलेलं पत्र; खुलासा करत म्हणाला…

पवन हा कर्नाटकातील मंड्या येथील रहिवासी होता. तिथेच त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पवन कामानिमित्त बराच काळ कुटुंबासोबत मुंबईत राहत होता. साऊथशिवाय त्याने हिंदी टीव्ही शोमध्येही काम केले होते. त्याच्या पालकाचे नाव नागराजू आणि सरस्वती आहे.

कोणी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आवडली? सुबोध भावे म्हणाला…

पवनच्या आकस्मिक निधनाने कुटुंबासह चाहत्यांना आणि दक्षिण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. मंड्याचे आमदार एचटी मंजू आणि ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बी नागेंद्र कुमार यांच्यासह अनेक नेत्यांनी पवनच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tv actor pawan death dies due to heart attack age 25 hrc