मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीने जागतिक एड्स दिनानिमत्त मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर नागरिकांची एचआयव्ही तपासणी केली असता त्यात ८८ नागरिकांनी संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. या सर्व नागरिकांची एआरटी उपचार केंद्रांवर नोंदणी करून त्यांच्यावर उपचार सुरू केल्याची माहिती मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीकडून देण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ४२० कोटी रुपयांचा कर चुकवल्याचे प्रकरण :अनील अंबानींवर पूर्वलक्ष्यी प्रभावाने कारवाई करता येईल का? उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा

मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीकडून जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर डिसेंबरमध्ये १० दिवस चाचणी केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यात सीएसएमटी, दादर, घाटकोपर, कुर्ला, मानखुर्द, वडाळा अंधेरी, वांद्रे आणि बोरिवली या नऊ महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश होता. त्याला मुंबईतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नऊ रेल्वे स्थानकांवर चाचणी करण्यात आलेल्या २९ हजार ३१४ नागरिकांपैकी ८८ नागरिकांना एड्सची लागण असल्याचे आढळून आले. या नागरिकांना संसर्ग झाल्याचे माहित नव्हते. मात्र या चाचणीतून ते स्पष्ट झाल्यानंतर त्यांना एआरटी केंद्रावर आणण्यात आल्याची माहिती मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजय करंजकर यांनी दिली.

हेही वाचा- भेदभाव करणारा आदेश काढल्याचे प्रकरण : माजी महानगरपालिका अधिकारी सुरेश काकाणींना उच्च न्यायालयाचा दिलासा

मागील काही वर्षात मुंबईतील एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. २०१९-२० मध्ये ४ लाख ७५ हजार ५४० नागरिकांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील ४ हजार ४७३ नागरिकांना लागण झाल्याचे आढळले. तसेच २०२१-२२ मध्ये ३ लाख ८७ हजार ३९९ नागरिकांपैकी ३ हजार ८७ नागरिकांना लागण झाल्याचे आढळून आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 88 people were found to be infected with hiv during the test at the railway station in mumbai print news dpj