मुंबई: मालाडमधील मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयासमोरील लिबर्टी उद्यान येथे शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास ७५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून गळती होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे मालाडमधील काही भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत पिसे – पंजारपोळ जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामामुळे मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता मालाडमधील जलवाहिनीतून गळती होऊ लागल्यामुळे मामलेदार वाडी, एस. व्ही. रोड, भारदन नगर, आदर्श गल्ली, रे पाडा, चिंचोली बंदर, रामचंद्रन गल्ली परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

हेही वाचा… हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गालगतच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A water pipe leaked at liberty garden in front of bmc office in malad this has affected the water supply in some parts of malad mumbai print news dvr