गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधील हवेचा निर्देशांक सुधारल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वी हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीत नोंदला गेला होता. मात्र मागील काही दिवसांपासून सातत्याने तो समाधानकारक श्रेणीत नोंदला जात आहे. दरम्यान, समीर ॲपनुसार मंगळवारी सायंकाळी देवनार येथे वाईट हवेची नोंद झाली. वातावरणातील घातक पीएम२.५ आणि पीएम १० धूलिकणांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले. देवनार येथे मंगळवारी सायंकाळी वाईट हवेची नोंद झाली. तिथे हवा गुणवत्ता निर्देशांक २९७ नोंदवला गेला. यामुळे अशा वातावरणात घराबाहेर पडणे घातक ठरू शकते. संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता अधिक असते. याशिवाय माझगाव, शीव या परिसरातील हवा मध्यम असल्याची नोंद मंगळवारी करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी मुंबईत सहा गुन्हे दाखल

मुंबई शहरातील धूलिकणांचे प्रमाण मागील काही दिवसांपासून कमी झाल्याचे दिसून आले. जानेवारीच्या सुरुवातीपासून मुंबईतील हवेच्या दर्जात सुधारणा झाल्याचे दिसले. दरम्यान, मुंबई शहरात धुलीकणांचे दिवसेंदिवस वाढते प्रमाण लक्षात घेऊन मुंबई महापालिका, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली. तसेच अनेक भागातील हवा गुणवत्ता निर्देशांकात जवळपास ५० टक्क्यांनी सुधारणा झाली आहे. दरम्यान, मंगळवरी सायंकाळी देवनार येथील हवा वाईट श्रेणीत नोंदली गेली. हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार तेथील पीएम २.५ आणि पीएम १० धूलिकणांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा >>> “मग मुंबईचे रस्ते बंद करावेत का?”, कर्मचाऱ्यांना मराठा आरक्षण सर्वेक्षणात जुंपल्याने HC ने मुंबई पालिकेला फटकारले

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार, हवा गुणवत्ता निर्देशांकातील ०-५० म्हणजे चांगले, ५१-१०० मधीस समाधानकारक, १०१-२०० दरम्यान मध्यम, २०१-३०० वाईट, ३०१-४०० दरम्यान अत्यंत वाईट आणि ४०० पेक्षा जास्त म्हणजे अतिधोकादायक समजली जाते. देवनार येथे पीएम २.५ कणांची मात्रा अधिक आहे. पीएम २.५ हे अधिक घातक असून ते श्वसनाद्वारे शरीरात जातात, त्यांचे हवेतील सामान्य प्रमाण हे ३५ मायक्रो घनाहून जास्त नसावे. किंबहुना हे कण पीएम१० च्या तुलनेत सूक्ष्म असल्याने सहज शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे ते आरोग्यास घातक ठरतात.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According to sameer app bad air quality reported in deonar mumbai print news zws