मुंबईः धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी मुंबईत सोमवारी सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाकोला, गोवंडी, भोईवाडा, व्ही. पी. मार्ग, मालवणी व ओशिवरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. दरम्यान, शहरात कोणतीही गंभीर घटना घडलेली नसून बहुसंख्य ठिकाणी झेंडे लावण्यावरून वाद झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.सांताक्रुझ पूर्व येथे धार्मिक झेंड्याचा अपमान केल्याप्रकरणी वाकोला पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती.

हेही वाचा >>> “मग मुंबईचे रस्ते बंद करावेत का?”, कर्मचाऱ्यांना मराठा आरक्षण सर्वेक्षणात जुंपल्याने HC ने मुंबई पालिकेला फटकारले

thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
bmc employees removed artificial lights on trees
प्रकाश प्रदूषक रोषणाई हटविण्यास सुरुवात; उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेकडून कारवाई
63 year old woman duped of rs 80 lakh after threatened with ed name zws
ईडीची धमकी देत ज्येष्ठ नागरिक महिलेची ८० लाखांची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- वाचा काय प्रकार आहे … 
man molests 15 year minor girl in running local train
रेल्वेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

जमावाने स्वतः पकडून आरोपीला पोलीस ठाण्यात आणले. त्यानुसार धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी वाकोला पोलिसांनी २६ वर्षीय कपडे शिवण्याचा व्यवसाय करणाऱ्या तरूणाला अटक केली. सिगारेट पिताना हटकले असता आरोपीने तेथील झेंडे काढून फेकून देण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. गोवंडी येथे दुसऱ्या घटनेत व्हॉट्स ॲपवर धार्मिक भावना दुखावेल अशी पोस्ट केल्याप्रकरणी २३ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली. वसतिगृहात राहणाऱ्या २३ वर्षीय विद्यार्थ्याने ही पोस्ट पाहिल्यानंतर गोवंडी पोलिसांकडे तक्रार केली होती. तिसऱ्या घटनेत धार्मिक झेंडे काढून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भोईवाडा पोलसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ५५ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली. चौथ्या घटनेमध्ये मालवणी येथेही झेंंडे काढल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> तमिळ भाषिक सफाई कामगारांना मराठा सर्वेक्षणाचे काम

पाचव्या घटनेत अंधेरी येथे दुचाकी व मोटरगाड्यांना झेंडे लावून रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी या रॅलीच्या मागे असलेल्या मोटरगाडीवर दगडफेक करण्यात आल्याची तक्रार ओशिवरा पोलिसांकडे करण्यात आली आहे. आपण या रॅलीचा भाग नसल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. आपण या रॅलीमागून मोटरगाडी घेऊन जात होते. पण गाडीवर झेंडा असल्यामुळे दगडफेक करून मारहाण करण्यात आली. यावेळी आरोपींनी घोषणाबाजी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाव्या घटनेत गिरगाव जवळील इस्लामपुरा परिसरात रॅलीदरम्यान दोन व्यक्तींनी धमकावल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरोधात व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.