मुंबईः हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी १० पथके तैनात करण्यात आली आहेत. वांद्रे परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणाची तपासणीत करताना संशयीत दिसल्याचे सूत्रांनी सांगितले. संशयीत विरारच्या दिशेने गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी विविध ठिकाणी पथके पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सैफच्या घरात तीन खोल्या आहेत. त्यातील एका खोलीत सैफ व करीना राहतात. दुसऱ्या खोलीत तैमुर व त्याची आया लिना व तिसऱ्या खोलीत सैफचा धाकटा मुलगा जहांगीर उर्फ जयबाबा, एक नर्स लिमा व आया जुनु राहतात. आगीपासून संरक्षण करण्यासाठी इमारतीत असलेल्या जिन्यावरून चढून आरोपी वर आला. सैफचा धाकटा मुलगा जहांगिरच्या खोलीतील शौचालयाच्या खिडकीतून आरोपी घरात शिरला. घरात शिरलेल्या अनोळखी व्यक्तीला पाहून सैफ अली खानकडे काम करणारी महिला नर्स एरियामा फिलिप्स ऊर्फ लिमा जहांगीरला उचण्यासाठी धावल्या असता आरोपीने त्यांच्यावर हेक्सा ब्लेडसारख्या वस्तूने हल्ला केला. त्यावेळी सैफ अली खान व करीना दोघेही तेथे पोहोचले.

हेही वाचा >>>हॉटेलमधून कृषी क्षेत्राचा ‘पंचतारांकित’ आढावा

त्यावेळी हल्लेखोराने हेक्सा ब्लेटसारख्या हत्याराने सैफवर हल्ला केला. तैमुरची आया लिमा या मध्ये पडल्या. आरोपींने केलेल्या हल्यात त्याही जखमी झाल्या. ही घटना बुधवारी मध्यरात्री अडीच्या सुमारास घडली. सैफ अली खानला एकूण सहा जखमा झाल्या आहेत. दोन गंभीर स्वरूपाच्या आहेत. प्रामुख्याने त्याच्या पाठीवर, एक मणक्याजवळ असलेली जखम गंभीर आहे. त्याच्या मानेवर एक किरकोळ जखम आहे, तर उर्वरित जखम किरकोळ स्वरूपाची आहे. सैफवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची स्थिती स्थिर आहे. हल्याच्या वेळी सैफच्या घरात पत्नी करीना कपूर, दोन मुलगे व तीन महिला कर्मचारी असे सात जण होते. सैफ अली खानचा मुलगा जहांगीरच्या खोलीत चोरटा शिरला. त्या खोलीत दोन महिला कर्मचारी झोपल्या होत्या. यातील एका महिला कर्मचाऱ्याला त्याने शांत राहण्यास सांगून धमकावले. तसेच १ कोटी रुपये मागितले.

याप्रकरणी सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या तपासणीअंती आरोपीची ओळख पटली असून तो सराईत असल्याचे वाटत आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखाही समांतर तपास करत आहे. त्या दृष्टीने वांद्रे येथे आरोपीशी साधर्म्य असलेला संशयीत दिसून आला आहे. त्याच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके पाठवण्यात आली आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack on saif ali khan suspect spotted on cctv camera in bandra mumbai print news amy