मागील अनेक दिवसांपासून पाऊसाने सर्व अंदाज चुकवले आहेत. अनेक ठिकाणी पावसाने दांडी मारल्याने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चाऱ्यापर्यंत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) मुंबईत पुढील ४ दिवस कधी आणि किती पाऊस पडेल याचा अंदाज वर्तवला आहे. यानुसार आज (७ सप्टेंबर) मुंबईसह आजूबाजूच्या भागात पावसाच्या हलक्या सरी बरसतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयएमडीने मुंबईसाठी ७, ८, ९ सप्टेंबरला ग्रीन अलर्ट जारी केला आहे. या तीन दिवसात मुंबईत हलक्या सरींसह पाऊस पडेल, असा अंदाज आहे. तसेच १० सप्टेंबरला मुंबईसाठी यलोव अलर्ट जारी केला आहे. या दिवसी वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

७ सप्टेंबरला राज्याच्या सर्वच भागात पाऊस अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात उत्तर कोकण, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भासह गोव्याचाही समावेश आहे.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनीही ट्वीट करत मुंबई-ठाण्यातील पावसाच्या अंदाजाची माहिती दिली. ते म्हणाले, “७ सप्टेंबरला मुंबई, ठाणे आणि बाजूबाजूच्या भागात मागील २४ तासात चांगल्या पावसाची नोंद झाली. यातील बहुतांश पाऊस सकाळच्या वेळेत पडला. बहुप्रतिक्षित पावसाचे अखेर शहरात आगमन झाले आहे.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imd weather forecasting mumbai weather updates alert pbs