Maharashtra Assembly Speaker Election Live, 03 July 2022: विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत होत आहे. दरम्यान कामकाजाला सुरुवात होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यपालांचा उल्लेख करत टोला लगावला. जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आभार मानताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाना पटोलेंचे आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Maharashtra Assembly Speaker Election Live: राहुल नार्वेकर नवे विधानसभा अध्यक्ष, बहुमताचा आकडा पार; पहा प्रत्येक अपडेट

जयंत पाटील काय म्हणाले –

“मला सर्वात प्रथम राज्यपालांचे आभार मानायचे आहेत. गेले अनेक महिने महाराष्ट्राच्या विधानसभेला याची प्रतिक्षा होती. वारंवार आम्ही विनंती करुनही त्यांनी निवडणूक लावली नाही. ते कशाची वाट पाहत होतो हे आमच्या लक्षात आलं. हे आधीच सांगितलं असतं तर एकनाथ शिंदेंनी हे आधीच केलं असतं,” असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

“राज्यपालांनी देशाला आदर्श घालून दिला आहे. आता त्यांनी १२ आमदारांची पाठवलेली यादी तात्काळ मान्य करावी,” अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली. यानंतर देवेंद्र फडणवीस उभे राहिले आणि नाना पटोले यांच्यामुळे हा दिवस पहायला मिळाला, मित्र म्हणून ते जागले आहेत असा टोला लगावत आभार मानले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly speaker election ncp jayant patil eknath shinde governor bhagat singh koshyari bjp devendra fadanvis sgy
First published on: 03-07-2022 at 11:38 IST