मुंबई : सिग्नल, ओव्हरहेड वायर यासह अन्य तांत्रिक कामांसाठी १३ मे रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे.
या मार्गावरील लोकल गाडय़ा दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावतील. हार्बरवरही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाऊन मार्ग आणि पश्चिम रेल्वेवर माहिम जंक्शन ते अंधेरी अप आणि डाऊन
हार्बर मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे.
मध्य रेल्वे-मुख्य मार्ग
कुठे : कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावर.
कधी : रविवार, १३ मे २०१८. स.११.२० ते ४.२० वा.
परिणाम: कल्याण ते मुलुंडदरम्यान अप धिम्या आणि अर्धजलद लोकल गाडय़ा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.
पश्चिम रेल्वे
कुठे: माहिम जंक्शन ते अंधेरी अप आणि डाऊन हार्बर मार्ग
कधी : रविवार, १३ मे २०१८. स. १०.३५ ते दु. ३.३५ वा.
हार्बर मार्ग
कुठे: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाऊन मार्ग
कधी: रविवार, १३ मे २०१८. अप मार्गावर स.११.१० ते सायं.४.१० आणि डाऊन मार्गावर स.११.४० ते सायं.४.४० वा.