विमान प्रवासादरम्यान प्रवाशांच्या विचित्र वागणुकीची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. दोनच दिवसांपूव्री दिल्लीत खराब हवामानामुळे विमान टेक ऑफला उशीर झालेला असता एका प्रवाशाने विमानाचं अपहरण झाल्याचं ट्वीट केलं होतं. ज्यामुळे विमानतळ प्रशासन आणि पोलिसांची धावपळ झाली होती. आता असाच एक प्रवासी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाहायला मिळाला आहे. या प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रवाशाने विमान हे धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच इमर्जन्सी गेट (आपत्कालीन दरवाजा) उघडण्याचा प्रयत्न केला होता. विमानातील क्रू मेंबर्सनी याची माहिती दिल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे विमान नागपूरहून मुंबईला आलं होतं. इंडिगो विमान ६ई-४२७४ च्या वरिष्ठ केबिन क्रूच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २४ जानेवारीची आहे. दुपारी १२ वाजता हे विमान नागरपूरहून मुंबईत दाखल झालं होतं. यावेळी इंडिकेटरद्वारे क्रू मेंबर्सना समजलं की, कोणीतरी आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत आहे. क्रू मेंबर्स आपत्कालीन दरवाजापर्यंत पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की, एका प्रवाशाने आपत्कालीन दरवाजावरील गेट कव्हर काढलं होतं.

केबिन क्रूने याबाबतची माहिती कॅप्टनला दिली. त्यानंतर या प्रवाशाची तक्रार करण्यात आली. पोलिसांनी माहिती दिली की, त्यांनी भारतीय दंड विधानातील कलम ३३६ आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, त्यांना प्रवाशाचं नाव देण्यात आलं आहे. तसेच क्रू मेंबर्सचं मत नोंदवले जाईल, त्यानंतर त्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल.

हे ही वाचा >> “कालपासून जेवलो नाही, भुकेने व्याकुळलोय…”, दुकानातली मिठाई खाण्यापूर्वी चोराने लिहिलं हृदय हेलावणारं पत्र

तेजस्वी सूर्या यांच्याकडूनही इमर्जन्सी गेट उघडलं गेलं

भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी १० डिसेंबर रोजी इंडिगो फ्लाइटचं इमर्जन्सी गेट उघडलं होतं. ते इंडिगोचं विमान ६ई-७३३९ मधून प्रवास करत होते. याप्रकरणी डीजीसीएने चौकशीचे आदेश देखील दिले होते. याबाबत माहिती देताना उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले होते की, तेजस्वी सूर्या यांच्याकडून चुकून आपत्कालीन दरवाजा उघडला गेला होता आणि त्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur mumbai indigo passenger tries to open emergency exit door of flight mid air asc