मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ कारशेडविरोधात आता ठाण्यातही आंदोलन केले जाणार आहे. ठाण्यातील काँग्रेसच्या पर्यावरण कक्षाकडून रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरे कारशेडला मोठा विरोध असतानाही राज्य सरकार आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) आरे कारशेडवर ठाम आहे. त्यामुळेच कांजुरमार्गवरून कारशेड पुन्हा आरेत आणून कारशेडच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सरकार-एमएमआरसी विरुद्ध पर्यावरणप्रेमी हा वाद चिघळला आहे. हे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले आहे. तसेच दररविवारी आरे वाचवा आंदोलन केले जात आहे.

येता रविवार हा आरेतील आंदोलनाचा आठवा आठवडा आहे. या रविवारी ठाण्यात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर काँग्रेसच्या पर्यावरण विभागाकडुन सकाळी १० वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. यासंबंधीचे पत्र जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांना देण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्या ठाण्यातील पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक यांनी दिली. जंगल नष्ट करून पर्यावरण धोक्यात आणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आमचे हे आंदोलन आहे, असे वर्तक यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On sunday congress going to protest on aarey car shed issue at chief minister thane residence mumbai print news asj
First published on: 19-08-2022 at 12:01 IST