Premium

शरद पवारांना ठार मारण्‍याची धमकी देणारा भाजपा कार्यकर्ता; बावनकुळे, दानवेंसोबतची छायाचित्रे समोर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ठार मारण्याची धमकी मिळाल्‍यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच त्यांना धमकी देणारा हा अमरावतीतील भाजपाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

threatened Sharad Pawar
शरद पवारांना ठार मारण्‍याची धमकी देणारा भाजपा कार्यकर्ता; बावनकुळे, दानवेंसोबतची छायाचित्रे समोर (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ठार मारण्याची धमकी मिळाल्‍यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच त्यांना धमकी देणारा हा अमरावतीतील भाजपाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. सौरभ पिंपळकर नावाच्या तरुणाने ट्विटरवरून पवारांना धमकी दिली. तेव्हापासून सौरभ पिंपळकरचा पोलीस शोध घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील साईनगर भागात राहणारा २६ वर्षीय सौरभ हा भाजपाचा कार्यकर्ता आहे. त्‍याच्‍या टि्वटर अकाउंटवर त्‍याने ‘आय ॲम बीजेपी ॲक्टिव्हिस्‍ट, आय हेट सेक्‍यूलेरिझम’ असे लिहून ठेवले आहे. अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सौरभ पिंपळकरच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. गाडगेनगर पोलिसांचे पथक त्‍याच्‍या शोधात आहे. हे पथक त्‍याच्‍या घरीही जाऊन आले, पण तो आढळून आला नाही, त्‍याचा मोबाईलदेखील बंद आहे.

हेही वाचा – “महाराष्ट्रात शिंदे-फडणवीसांचं जंगलराज, झेपत नसेल तर सत्ता सोडा”, कायदा सुव्यवस्थेच्या कारणावरून नाना पटोले कडाडले

या प्रकरणी सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत. अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलीस आयुक्‍तांनी दिली. सौरभ पिंपळकरचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबतची काही छायाचित्रे आता समाज माध्‍यमावर प्रसारित होऊ लागली आहेत. येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्‍थेतील कॉपी प्रकरणात भाजपाचा माजी नगरसेवक प्रणीत सोनी याच्‍यासह सौरभ हा सहआरोपी असल्‍याची माहिती समोर आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2023 at 17:01 IST
Next Story
“महाराष्ट्रात शिंदे-फडणवीसांचं जंगलराज, झेपत नसेल तर सत्ता सोडा”, कायदा सुव्यवस्थेच्या कारणावरून नाना पटोले कडाडले