Nagpur Violence Updates: नागपूरच्या महालमधील झेंडा चौकात दोन गटांत झालेल्या संघर्षानंतर काल मोठी जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड झाली होती. यावेळी जमावाल पांगवताना एका गटातील लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्या गटावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला. दरम्यान या घटनेत काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूरमध्ये काल झालेल्या हिंसाचारानंतर शहरात सध्या काय परिस्थिती आहे, याबद्दल नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, “नागपूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात असून शहरात सध्या शांतता आहे. या हिंसाचाराप्रकरणी आम्ही ५० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना आम्ही शोधून काढत आहोत.”

डॉ. रविंदर सिंगल यांनी पुढे सांगितले की, “या घटनेत ३३ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी चांगले काम केले आहे. हिंसाचार करणाऱ्यांची ओळख पटवली जात असून, त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर सर्व संबंधित कलमे लागू केली जाणार आहेत. नागपुरात पोलीस आणि इतर सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नागपूरच्या काही भागात संचारबंदी लागू आहे. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून संबंधित लोकांसोबत बैठक घेण्यात येणार आहे.”

शाळांना सुट्टी

नागपूरमध्ये सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडलेल्या, घटनेचा परिणाम शहरातील सामान्य जनजीवनावर झालेला आहे. शहराच्या अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. यासह शहरातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. संदीपानी आणि शाळा सेंटर पॉइंट स्कूल आणि अन्य शाळांचाही यामध्ये समावेश आहे. मात्र शिक्षण विभागाकडून शाळांना सुट्टीच्या सार्वजनिक सूचना अद्यापही आलेल्या नाहीत.

स्थानिक आमदार दटकेंचा आरोप

महल परिसरातील घरे आणि वाहने जाळण्याबाबत भाजपचे स्थानिक आमदार प्रवीण दटके यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, “बाहेरुन आलेल्या काही लोकांनी परिसरातील घरांना आणि वाहनांना आग लावली.”

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितले?

हंसरपुरी येथे झालेल्या हिंसाचाराबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, “आमच्या परिसरात काही समाजकटंक आले होते त्यांनी हा प्रकार केला आहे. एक टोळी आली होती त्यांच्या चेहरा रुमालाने झाकलेला होता. त्यांच्या हाताता धारदार हत्यारे होती. त्यांनी परिसरात गोंधळ केला. घरे, दुकाने, वाहनांवर दगडफेक केली.”

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur police response clash curfew arrests aam