महेश बोकडे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) वयाची चाळीशी ओलांडलेल्या त्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता पूर्वीच्या ५०० रुपयांच्या एवजी ११ प्रकारची तपासणी केल्यास प्रत्येक दोन वर्षांत संबंधितांना ३ हजार रुपयांची प्रतिपुर्ती महामंडळ करणार आहे.

एसटी महामंडळात पूर्वी बस चालकांना नेत्र तपासणी सक्तीची होती. तर दुसरीकडे काही तपासणीसाठी महामंडळाकडून कर्मचारी- अधिकाऱ्यांना ५०० रुपये वैद्यकीय प्रतिपुर्ती केली जात होती. परंतु, महामंडळाने १ फेब्रुवारी २०२४ रोजी वयाची चाळीशी ओलांडलेल्या सगळ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना लागू केली आहे. त्यानुसार प्रत्येक दोन वर्षांत अधिकारी- कर्मचाऱ्यांना ‘सीबीसी’सह विविध प्रकारच्या तब्बल ११ तपासणी करणे बंधनकारक राहणार आहे.

आणखी वाचा-‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मराठ्यांबाबतची विशेष भूमिका जातीयवादी’, ओबीसी युवा मंचचा आरोप

नवीन योजनेनुसार या सगळ्या तपासण्यांसाठी लागणाऱ्या खर्चाची ३ हजार रुपयापर्यंतची प्रतिपुर्ती महामंडळाकडून संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यांना करावी लागणार आहे. परंतु, तपासणीसाठी प्रथम अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्वत:च खर्च करायचा आहे. महामंडळातील कर्मचारी- अधिकारी आरोग्याच्या दृष्टीने जागृत रहावे सोबत त्यांचे आरोग्य चांगले राहल्यास प्रवाश्यांना सुरक्षीत प्रवास करता येईल, म्हणून ही योजना असल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. त्यातच या वैद्यकीय तपासणीसाठीचा एक दिवस संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्याचा कर्तव्यकाळ म्हणूनही समजण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला तो वैद्यकीय तपासणीसाठी मुख्यालय वा मुख्यालयाबाहेरील रुग्णालयात जाणार असल्याची पूर्वकल्पना संबंधितांना द्यावी लागणार आहे. या वैद्यकीय तपासणीची नोंद त्याच्या सेवापुस्तकातही होणार आहे. या योजनेबाबतचे आदेश राज्यातील सगळ्याच विभाग नियंत्रक कार्यालयात गुरूवारी धडकले. या वृत्ताला नागपूरातील एसटीच्या विभाग नियंत्रक कार्यालयाने दुजोरा दिला आहे.

आणखी वाचा-बुलढाणा: बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी जखमी; आरडाओरड केल्याने वाचले प्राण

‘या’ तपासणी बंधनकारक

सी. बी. सी., थायरॉईड, ब्लूड शुगर एच. बी. ए. आय. सी., कोलेस्ट्रॉल, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन, बोन डेन्सिटी, बोन डोन्सिटी, एक्स- रे / ई. सी. जी., आय टेस्ट, मॅमोग्राफी (फक्त महिलांसाठी) बंधनकारक आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St employees will undergo health check every two years mnb 82 mrj