लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्धा: केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचा विदर्भ दौरा ग्रामीण भागासाठी फलदायी ठरला. गावात केंद्रीय मंत्री येताहेत अन् त्या भेटीचा फायदा करून घेणार नाही ते खासदार कसले.

कराड यांच्या नागपूर वर्धा दौऱ्यात खासदार रामदास तडस यांनी जणू पिच्छाच पुरवला. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या ११४ व ग्रामीण बँकांच्या सहा शाखा सेवा देण्यास अपुऱ्या ठरतात. जिल्हा बँकांच्या आट्ठेचाळीस शाखा बंद पडल्याने शेतकरी बँक सेवापासून वंचित झाला असल्याचे तडस यांनी निदर्शनास आणले. काही ठिकाणी शाखा सुरू करणे आवश्यक आहे.

आणखी वाचा-अकोला: दोन गटातील वादातून दगडफेक, एकाचा मृत्यू; शहरात जमावबंदी लागू

तळेगाव टालातुळे, दहेगाव गोसावी, रसुलाबाद, नारा, वेळा व अन्य मोठ्या गावात बँक शाखा आवश्यक ठरतात. या गावाच्या पाच किलोमीटरच्या परिघात शाखा नाहीत. सर्व आर्थिक व्यवहार दूरवर जावून करावे लागतात. म्हणून शाखा उघडून दिलासा द्यावा, अशी विनंती तडस यांनी केली.

ते म्हणाले की मंत्री कराड यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. हे मुद्दे त्यांना पटले आहेत. स्पष्ट हमी मिळाली नाही, पण या शाखा सुरू होतील अशी खात्री मी देवू शकतो. पाच हजारांवर लोकसंख्या असलेली ही पाच गावे रिझर्व्ह बँकेच्या निकषात बसतात, असा विश्वास तडस यांनी व्यक्त केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister of state for finances visit to vidarbha is good for rural areas pmd 64 mrj