police inspector and Sub-inspector suspended in Dhadgaon nandurbar rape and murder case | Loksatta

नंदुरबार : धडगाव बलात्कार आणि हत्या प्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित

धडगाव तालुक्यातील खडक्या येथील एका तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकासह सहा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

नंदुरबार : धडगाव बलात्कार आणि हत्या प्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित
संग्रहित छायाचित्र

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील खडक्या येथील एका तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्याच्या तत्कालीन निरीक्षकासह एका उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. याआधी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलेल्या या दोघांच्या निलंबनाचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी काढले आहेत.

हेही वाचा- सप्तश्रृंग गडावरील बोकडबळी प्रथेसंबधी जनहित याचिका; सोमवारी सुनावणी

भाजपा नेत्या चित्रा वाघ पीडितेच्या कुटुंबियांच्या भेटीला

मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची पीडितेच्या वडिलांची तक्रार आहे. या प्रकरणी जे. जे. रुग्णालयात कुटूंबियांच्या मागणीनुसार पीडितेच्या मृतदेहाचे पुन्हा विच्छेदन देखील झाले असून न्याय वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा कायम आहे. दरम्यान, या प्रकरणात याआधी तत्कालीन पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकासह सहा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी कुटूंबियांची भेट घेतल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली.

हेही वाचा- धुळ्यात पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर; पाण्यासाठी नगरसेवकाचे ‘शोले’ टाईप आंदोलन

अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी

या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची केवळ बदली करुन चालणार नाही तर त्यांचे निलंबन व्हावे, अशी मागणी त्यांनी केली होती. तसेच या प्रकरणात सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटनांनीही दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली होती. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे अहवाल सादर केला होता. त्यानुसार या संपूर्ण प्रकरणात हलगर्जीपणा दाखविल्या प्रकरणी तत्कालीन निरीक्षक गोकुळ औताडे आणि उपनिरीक्षक बी. के. महाजन यांना निलंबित करण्यात आले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक शेखर यांनी त्यास दुजोरा दिला आहे. चित्रा वाघ यांनीही या निलंबनासंदर्भात ट्वीट केले आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सप्तश्रृंग गडावरील बोकडबळी प्रथेसंबधी जनहित याचिका; सोमवारी सुनावणी

संबंधित बातम्या

VIDEO: “अनेक मुलींचे खून हिंदू मुलांकडूनही झालेत आणि…”, ‘लव्ह जिहाद’वर बोलताना संजय राऊतांचं मोठं विधान
Ajit Pawar anger on Journalist: अजित पवार यांना जेव्हा राग येतो..
नाशिकमध्ये करोना परिस्थिती हाताबाहेर
अडीच हजार वर्षांपूर्वी सगळे बौद्ध होते; रामदास आठवलेंचं वक्तव्य
नाशिकमध्ये इडली विक्रेत्याकडून पाच लाखाच्या बनावट नोटा जप्त

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुण्यातील तरुणाचा भन्नाट प्रयोग; चक्क कंटेनरमध्ये घेतले काश्मिरी ‘केशर’चे पीक
मालवणी जेवण, ठेचा- बाकरवडी अन्… ‘चला हवा येऊ द्या’मध्ये विकी कौशलची थेट मराठीत डायलॉगबाजी
शेतकऱ्यांच्या मुलांना ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार; खरेदीसाठी सबसिडीही मिळणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार
“आता लवकरच…” लग्नानंतरची पाठकबाईंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
सॅलेडमध्ये मीठ टाकण्याची सवय आहे का? यामुळे होऊ शकते आरोग्याचे नुकसान, लगेच जाणून घ्या