पालघर: ठाणे जिल्ह्याप्रमाणे पालघर जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा वाहणार असून या आदिवासीबहुल जिल्ह्याला इतर राज्यांप्रमाणे विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे सरकार प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे विश्वास फाउंडेशन मार्फत आयोजित महिला सक्षमीकरण व आरोग्य शिबिर कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन हजेरी लावून ही ग्वाही जिल्ह्याच्या विकासावर बोलताना दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालघर जिल्ह्यामध्ये भौतिक सुविधा सह मूलभूत सुविधा पाणी योजना व मुंबई महानगर विकास प्राधिकरण यांच्यामार्फत विकास कामे करून हा जिल्हा आणखीन प्रगत जिल्हा बनवणार असल्याचे ही मुख्यमंत्री शिंदे यांनी या कार्यक्रमात ऑनलाईन उपस्थित राहताना सांगितले महिला सक्षमीकरणासाठी हे शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पालघर तालुक्यामधील चहाडे गावातील क्रीडा संकुलावर विश्वास फाउंडेशन आयोजित महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम आज दुपारी पार पडला या कार्यक्रमाला ऑनलाइन द्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवींद्र फाटक उपस्थित होते तर त्यांच्या समवेत व्यासपीठावर पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील सहाय्यक जिल्हाधिकारी संजिता मोहपात्र तर विश्वास फाउंडेशनचे संस्थापक डॉ. विश्वास वळवी, परिसरातील महिला सरपंच उपसरपंच व मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती.

या कार्यक्रमामध्ये महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिरासोबत महिला सक्षमीकरण यासोबत इतर कार्यक्रम विश्वास फाउंडेशन मार्फत आयोजित करण्यात आला होता. अलीकडेच राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना स्थान देण्यात आले असून महिलांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे. विकासाच्या पंचामृतात महिलांसाठी विशेष धोरण आखण्यात आले आहे. महिलांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी महिना पंचवीस हजारापर्यंत वेतन असलेल्या महिलांना व्यवसाय कर मधून सूट देण्यात आली आहे. तर महिलांसाठी एसटीमध्ये 50% सवलत देण्यात येणार असल्याचे या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The development in palghar district chief minister eknath shinde statement women empowerment meeting ysh