-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीतील मतदान केंद्रावर आज त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. (Photo-ANI)
-
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू यांनी दिल्लीमध्ये सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. (Photo-ANI)
-
काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी आज आई सोनिया गांधी यांच्यासह मतदान केल्याचा बोटाची शाई दाखवताना एक फोटो पोस्ट केला आहे. (Photo Rahul Gandhi/X)
-
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी दिल्लीतील एका मतदान केंद्रावर मतदान केले. (Photo-ANI)
-
माजी भारतीय क्रिकेटर कपिल देव यांनीही मतदानाचा हक्क बजावला, यावेळी ते म्हणाले “मला खूप आनंद वाटतो की आपण लोकशाहीत आहोत. आपल्या मतदारसंघासाठी योग्य प्रतिनिधीची निवड करणे आपल्या हातात आहे ते आपण केले पाहिजे.” (Photo-ANI)
-
ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भुवनेश्वरमध्ये त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. (Photo-ANI)
-
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “हा लोकशाहीचा सण आहे, भारतीय जनतेच्या हक्कांचा उत्सव आहे, या उत्सवात सहभाग नोंदवणे ही खूप छान भावना आहे. मला विश्वास आहे की हा देश लवकरच महासत्ता होईल.” (Photo-ANI)
-
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही दिल्लीतील एका मतदान केंद्रावर जाऊन त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. (Photo-ANI)
-
काँग्रेसनेत्या प्रियांका गांधी यांच्या मुलांनीही (रैहान आणि मिराया) बजावला मतदानाचा हक्क (Photo-ANI)
-
आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी दिल्लीमध्ये मतदानाचा हक्क बजावला. (Photo-ANI)
-
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांची पत्नी सुदेश धनखर यांच्यासह मतदान केल्यानंतर शाई लावलेली बोटे दाखवली. (Photo-ANI)
-
क्रिकेटर गौतम गंभीर यानेही बजावला मतदानाचा हक्क आणि लोकांनी मतदान करावे असे आवाहन केले. (Photo-ANI)
-
आप नेत्या आतीशी यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. (Photo-ANI) हे देखील पहा- Lok Sabha Election 2024: देशात आज सहाव्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; मेनका गांधी, …

Nilesh Chavan Arrested: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक