-
मैथिली ठाकूर : बिहारच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा मैथिली ठाकूर यांची झाली. मैथिली ठाकूर यांनी (२५ वर्ष) या निवडणुकीत विजय मिळवला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपाला पहिल्या जेन-झी (Gen Z) आमदार मिळाल्या. (Photo Source: maithilithakur/instagram)
-
उमेद सिंह (राजस्थान) : १९६२ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी राजस्थानातील बारमेर येथून आमदार म्हणून निवडून आलेले उमेद सिंह हे भारतातील सर्वात तरुण आमदारांपैकी एक आहेत. नंतर त्यांनी १९८० आणि १९८५ मध्ये विजय मिळवला होता.(Photo Source:Jansatta)
-
अरुण वर्मा (उत्तर प्रदेश) : समाजवादी पक्षाच्या तिकिटावर सुलतानपूर मतदारसंघातून निवडून आलेले अरुण वर्मा २०१२ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झाले. ते उत्तर प्रदेशातील सर्वात तरुण आमदारांपैकी एक होते आणि त्यांना आदर्श तरुण आमदार पुरस्कार मिळालेला आहे. (Photo Source: Arun Verma/Facebook)
-
आदित्य सूरजेवाला (हरियाणा) : काँग्रेसचे दिग्गज नेते रणजित सुरजेवाला यांचे पुत्र आदित्य सुरजेवाला २०२४ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी हरियाणाचे सर्वात तरुण आमदार बनले. ते कैथलमधून विजयी झाले. (Photo Source:Aditya Surjewala/Facebook)
-
मायनमपल्ली रोहित (तेलंगणा) : तेलंगणातील मेडक येथून निवडणूक जिंकून वयाच्या २६ व्या वर्षी आमदार झालेल्या मायनमपल्ली रोहित यांनी पहिल्याच प्रयत्नात ज्येष्ठ नेते पद्मा देवेंद्र रेड्डी यांचा पराभव केला. (Photo Source:Mynampally Rohith/Facebook)
-
रोहित पाटील (महाराष्ट्र) : वयाच्या २६ व्या वर्षी रोहित पाटील यांनी महाराष्ट्रातील तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले. त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती. (Photo Source : Rohit R R Patil/Facebook)
-
उपासना मोहापात्रा (ओडिशा) : ओडिशातील ब्रह्मगिरी येथील भाजप उमेदवार उपासना महापात्रा २०२४ मध्ये वयाच्या २६ व्या वर्षी राज्यातील सर्वात तरुण आमदार बनल्या. (Photo Source:Upasna LB Mohapatra/Facebook)
-
श्रीकांत जिचकार (महाराष्ट्र) : भारतातील सर्वाधिक पदव्या (२०) असलेले व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे श्रीकांत जिचकर हे १९८० मध्ये वयाच्या २६ व्या वर्षी महाराष्ट्राचे सर्वात तरुण आमदार बनले होते. त्यांनी नंतर त्यांनी मंत्री म्हणून काम केले. -
नरिंदर कौर भारज (पंजाब) : २०२२ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत ‘आप’च्या उमेदवार म्हणून वयाच्या २७ व्या वर्षी आमदार झाल्या. त्यांनी कॅबिनेट मंत्री विजय इंदर सिंगला यांचा पराभव केला. (Photo Source:Narinder Kaur Bharaj/Facebook)
-
के. एम. सचिन देव (केरळ) : २०२१ मध्ये वयाच्या २८ व्या वर्षी केरळच्या बालुसेरी येथून निवडून आलेले सचिन देव १५ व्या केरळ विधानसभेतील सर्वात तरुण आमदार बनले. (Photo Source:Adv. K M Sachin Dev/Facebook)
-
मनसुख मांडवीय (गुजरात) : केंद्रीय मंत्री होण्यापूर्वी २००२ मध्ये वयाच्या २८ व्या वर्षी ते गुजरात विधानसभेतील सर्वात तरुण आमदार बनले. नंतर त्यांनी राज्यसभा आणि मंत्रिमंडळात महत्त्वाची भूमिका बजावली. (Photo Source:Mansukh Mandaviya/Facebook)
Tejashwi Yadav : “पराभवाचं दुःख…”, बिहार निवडणुकीतील अपयशानंतर तेजस्वी यादवांच्या राजदची पहिली प्रतिक्रिया