-
आज महाराष्ट्राच्या ४८ मतदारसंघाची मतमोजणी सुरु आहे.
-
देशभरात सात टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे.
-
महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातील त्यांचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आहेत.
-
त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीने राजन विचारे या विद्यमान खासदारांना उतरवलं आहे.
-
दरम्यान काही फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर उपलब्ध झालेल्या माहितीनुसार नरेश म्हस्के यांना आघाडी मिळाली आहे.
-
ही आघाडी तब्बल १ लाख मतांची आहे.
-
त्यामुळे त्यांना आता शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झालेल्या ठाण्यात शिंदेंचा उमेदवार ठाकरे यांच्या उमेदवाराला भारी पडणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
-
दरम्यान, अजून सर्व फेऱ्यांची आकडेवारी येणे शिल्लक आहे.
-
त्यानंतरचं गणित काय असणार? हे काही वेळानंतर स्पष्ट होईल.
-
(All Photos- Express photo by Narendra vaskar)

Daily Horoscope: महिन्याच्या शेवटच्या दिवशी स्वामी तुमच्या राशीला कसा देतील आशीर्वाद? मेष ते मीनचे राशिभविष्य वाचा