-
सोशल मीडियावरील एका छायाचित्रामुळे बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना आणि मुलगा अबराम पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाले आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात असलेले हे छायाचित्र शाहरूखची मुलगी सुहाना आणि मुलगा अबरामचे असल्याची चर्चा आहे. पण याबाबत अधिकृतपणे काहीही समजलेले नाही. दोघांनी आपल्या चेहऱ्यावर हात ठेवला असल्याने हे छायाचित्र नेमके त्यांचेच असल्याचे सांगणे कठीण आहे. दोघे समुद्रकिनारी खेळत असल्याचे छायाचित्रात दिसते. (सौजन्य – टि्वटर)
-
काही दिवसांपूर्वी सुहानाचे आपल्या मैत्रिणींसोबतचे हे छायाचित्र समाज माध्यमांवर व्हयरल झाले होते.
-
सुहानाचे छोटा भाऊ अबरामवर खूप प्रेम असून, त्याला ती सतत आपल्याबरोबर ठेवते.
-
भाऊ आर्यनबरोबरचे हे छायाचित्र सुहानाने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर शेअर केले होते.
-
१५ वर्षांची सुहाना मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थी आहे.
-
खेळ आणि नृत्याची आवड असलेली सुहाना शाळेतील अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होते. तिने उत्तम नृत्यांगना बनून जगभरात नाव कमवावे, अशी तिचे वडील शाहरूख खानची इच्छा आहे.
-
मागील वर्षी शाहरूख लंडनमधील एका आईस्क्रीम पार्लरमध्ये दिसला होता. त्यावेळी त्याच्याबरोबर आर्यन, सुहाना आणि अबरामदेखील होते. मुलांबरोबर वेळ घालविणे शाहरूखला आवडते.
-
सुहाना अद्याप लहान असली तरी आपला छोटा भाऊ अबरामची ती चांगली काळजी घेते.
-
आपल्या मुलांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करावे, अशी शाहरूखची इच्छा आहे.
-
सुहाना अनेक वेळा आपल्या मित्रपरिवारासोबत बाहेर फिरताना दिसते. याआधी देखील तिची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.
-
पालकत्व हे एखाद्या प्रवासाप्रमाणे असल्याचे सुपरस्टार शाहरूख खानचे मानणे आहे. या प्रवासादरम्यान तुमची अयशस्विता अचानकपणे तुमच्या समोर येते.
-
आर्यन आणि सुहानाचा विमानतळावरचा एक कूल अंदाज. (सौजन्य – टि्वटर)
-
आपल्या पावलावर पाऊल ठेवत मुलांनी चित्रपटात कारकीर्द करणे गरजेचे नसल्याचे शाहरूखचे मानणे आहे. असे असले तरी सुहानाला अभिनेत्री व्हायचे असल्याचे त्याने सांगितले.

१५ सप्टेंबरपासून ‘या’ ४ राशींची तिजोरी पैशाने भरेल! शुक्राच्या गोचरामुळे वाढेल संपत्ती; लवकरच मिळेल चांगली बातमी…