-
गेल्या काही दिवसांपासून आपल्या कामामुळे दुरावलेले प्रसिद्ध लव्हबर्ड्स विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे पुन्हा एकत्र आले आहेत. विराट आणि अनुष्कामध्ये काही कारणावरून भांडण झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांत जोरात रंगली होती. कित्येक दिवसांनंतर आता हे दोघे पुन्हा एकत्र आले असून यामुळे त्यांचे चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल.
-
वर्ल्ड टी २० नंतर विराट आता वेस्ट इंडिजसोबतच्या कसोटी मालिकेत खेळणार आहे. ही कसोटी मालिका २१ जुलैपासून सुरु होईल.
-
नुकतीच अनुष्का तिच्या चित्रपटाच्या कामाकरिता परदेशी गेली. त्यावेळी तिला विमानतळावर सोडण्यासाठी विराट कोहली गेला होता.
-
अनुष्काला निरोप देत विराटने तिला घट्ट मिठीही मारली.
-
नुकतेचं, अनुष्काने सुलतान या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. सलमान आणि अनुष्काची प्रमुख भूमिका असलेला सुलतान येत्या ६ जुलैला प्रदर्शित होईल.

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS