-
पोलीस हवालदार, सिक्युरिटी गार्ड, इस्त्रीवाला अशी कामं करणाऱ्या नागराज मंजुळेची आजच्या घडीची ओळख आहे ती पिस्तुल्या, फॅण्ड्रीसारख्या पुरस्कारप्राप्त चित्रपटांचा दिग्दर्शक अशी. मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्राचं सांस्कृतिकच नव्हे तर अख्खं सामाजिक जीवनच सैराटमय झालंय. जो तो सैराटमय झाला आहे. याचं श्रेय जातं ते नागराज पोपटराव मंजुळे या हरहुन्नरी दिग्दर्शकाला. नागराजचा जन्म २४ ऑगस्ट १९७७ रोजी झाला.
-
गावातल्या टुरिंग टॉकींजमधला चित्रपट पहायला नागराजला आवडायचे. व्हिडीओवरही एक रूपया देऊन तो चित्रपट पहायचा. शाळा बुडवून तो चित्रपट पहायला जात असत. नागराजला अमिताभ बच्चनचे चित्रपट आवडायचे. त्याचे चित्रपटाचे वेड तिथूनच सुरू झाले.
-
फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्यानंतर नागराजने सोशल मिडीयावर पोस्ट केले होते क, खूप लहानपणापासून हिंदी फिल्मफेअर पुरस्का बघत आलोय, खरं तर मला माहित असलेला अगदी पाहिला फिल्मी पुरस्कार म्हणजे फिल्मफेअर. त्यावेळी घरात ( दुसऱ्याच्या ) बसून टीव्हीवर हे पुरस्कार बघताना कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की एक दिवस मलाही हा फिल्मफेअर पुरस्कार मिळेल आणि तोही सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक !
चार्ली चॅप्लिनसह कॅमे-यास पोज देताना नागराज मंजुळे. त्याच्या या फोटोसह नागराज एक कविता फेसबुकवर पोस्ट केली होती. कुछ न किसी से बोलेंगे तन्हाई में रो लेंगे हम बेरहबरों का क्या साथ किसी के हो लेंगे ख़ुद तो हुए रुसवा लेकिन तेरे भेद न खोलेंगे जीवन ज़हर भरा साग़र कब तक अमृत घोलेंगे नींद तो क्या आयेगी "फ़राज़" मौत आई तो सो लेंगे -
नागराजचे पदवीपर्यंतचे शिक्षण जेऊर येथे झाले. पुढील शिक्षणासाठी तो पुणे विद्यापीठात शिकण्यासाठी गेला होता. मराठी विषयात एम.ए. करताना केशवसूत, मर्ढेकर, अरूण कोल्हटकर, नामदेव ढसाळ त्याला नव्याने भेटत गेले. अधिक जवळचे वाटत गेले. एम.फिल करत चित्रपटाचे विचार त्याच्या डोक्यात घट्ट बसलेले होते.
-
आमिर खानसह कॅमे-यास पोज देताना नागराज मंजुळे
भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना नागराज मंजुळे. -
नागराज हा उत्तम दिग्दर्शक तर आहेच. पण त्याचसोबत तो उत्तम कविताही करतो. त्याच्या 'उन्हाच्या कटाविरुद्ध' या कवितासंग्रहाला दमाणी साहित्य पुरस्कार मिळाला होता.

तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम