-
आपल्या देशाचे 'रिअल हिरो' म्हणजेच भारतीय जवानांना मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी एका वेगळ्याच प्रकारे मानवंदना दिली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकरने नुकतेच त्याच्या खास कॅलेंडरचे अनावरण केले. गेली काही वर्षे मराठी अभिनेत्रींच्या फोटोशूटचे कॅलेंडर प्रसिद्ध करणा-या तेजसने यावेळी सीमेवर लढणा-या सैनिकांना कॅलेंडरद्वारे सलामी देण्याचा प्रयत्न केला आहे. या कॅलेंडरमध्ये केवळ अभिनेतेच नाही तर अभिनेत्री देखील तडफदार लुकमध्ये दिसत आहेत. वैभव तत्त्ववादी, सुबोध भावे, नेहा पेंडसे, श्रेया पिळगावकर, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी, उमेश कामत, प्रिया बापट, आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे, सई ताम्हणकर, पूजा सावंत हे कलाकार आपल्याला या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहेत. तेजसने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहलेय की, २०१७ कॅलेंडर शूटसाठी खूप साऱ्या सैनिकांशी संवाद साधता आला. आम्हाला सगळ्यांनाच आपल्या सैनिकांबद्दल खूप आदर आहे आणि तो व्यक्त करण्यासाठीचा छोटासा प्रयत्न आहे.
-
वैभव तत्ववादी
-
प्रिया बापट
-
सिद्धार्थ जाधव
-
सई ताम्हणकर
-
उमेश कामत
-
पूजा सावंत
-
नेहा पेंडसे
-
उर्मिला कोठारे
-
जितेंद्र जोशी
-
श्रिया पिळगावकर
-
आदिनाथ कोठारे
-
सुबोध भावे

सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींचं दार; १२ महिन्यांनंतर भद्र महापुरुष राजयोगानं संपत्तीत होणार प्रचंड वाढ