-
सध्या 'लव्ह लग्न लोचा' या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकंदरीतच तरुणाईच्या अनुषंगाने सुरु करण्यात आलेली ही मालिका आता वृद्धांच्याही पसंतीला पडत आहे. अगदी हलकी-फुलकी आणि मेत्रीवर भाष्य करणाऱी अशी या मालिकेची कथा आहे. मुख्य म्हणजे या मालिकेतील ‘सौम्या’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री अक्षया गुरवही अनेकांच्याच मनाचा ठाव घेत आहे. काही चाहते तर तिच्या प्रेमात आहेत असं म्हणायला हरकत नाही. अशी ही सर्वांची लाडकी अक्षया नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे.
-
सिनेमॅटोग्राफर भूषण वाणी याच्यासोबत अक्षया विवाहबंधनात अडकली आहे. एका मित्राच्या निमित्ताने अक्षया आणि भूषणची ओळख झाली होती.
-
खरं सांगायचं झालं तर दोन वर्षांपासून तो अक्षयाला सोशल मीडियावर मेसेज करत होता. ती काही केल्या त्याच्या मेसेजेसना विशेष उत्तरं देतच नव्हती. पण, त्यानंतर त्यांची भेट झाली, मैत्री वाढली आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं हे कळलंच नाही, असं अक्षया म्हणाली.
-
मुख्य म्हणजे भूषणही याच इंडस्ट्रीतील असल्यामुळे त्याच्या आणि अक्षयामध्ये एक प्रकारचा समजुतदारपणा पाहायला मिळतो.
-
अक्षया आणि भूषणचं लग्न ‘लव्ह मॅरेज’ आहे. पण, प्रेम आणि त्यातही एकाच इंडस्ट्रीतील मुलासोबत प्रेम हा विषय ज्यावेळी अक्षयाच्या घरच्यांना कळला तेव्हा त्यांनी सुरुवातीला काही प्रश्न उपस्थित केले. अर्थात ते प्रश्न पडणं स्वाभाविक होतं.
-
भूषणला भेटताच अक्षयाच्या कुटुंबियांच्या सर्व शंका दूर झाल्या. असंच काहीसं अक्षयासोबतही घडलं. एका अभिनेत्रीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वसामान्य मुलाच्या घरी जशी परिस्थिती उदभवते तशीच परिस्थिती त्याच्याही घरी आली. पण, अक्षया- भूषणच्या नात्याला त्या दोघांच्याही कुटुंबियांनी लगेचच पसंती दिली.

India vs Sri Lanka Live Score, Asia Cup 2025: श्रीलंकेचा संघ सुपर ओव्हरमध्ये २ धावांवर ऑलआऊट