-
भारताला पहिला विश्वचषक मिळवून देणारे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्यावर आधारित चरित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हे तर एव्हाना साऱ्यांनाच माहिती पडले असेल. कबीर खान दिग्दर्शित या सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. पण फार कमी लोकांना हे माहित आहे की कपिल देव यांचे फार पूर्वीपासूनच बॉलिवूडकरांशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. नाना पाटेकरांपासून ते सुश्मिा सेनपर्यंत साऱ्यांशीच त्यांचे चांगले संबंध आहेत. आज आपण अशाच काही त्यांच्या बॉलिवूडकरांसोबतच्या मैत्रीला उजाळा देणार आहोत. अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत कपील देव (एक्स्प्रेस फोटो)
-
ज्येष्ठ अभिनेते प्राण, शशी गोस्वामी, हेमा मालिनी, मनोज कुमार आणि कपील देव. (एक्स्प्रेस फोटो)
-
ज्येष्ठ अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांच्यासोबत कपिल आणि त्यांची पत्नी रोमी देव मुलीसमवेत (एक्स्प्रेस फोटो)
-
माजी पंतप्रधान राजीव गांधी, ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर, बलराम जाखर यांच्यासोबत कपिल देव. (एक्स्प्रेस फोटो)
-
अभिनेत्री डिपल कपाडिया, अभिनेता सलमान खान आणि संजय दत्त यांच्यासोबत कपिल देव आणि सचिन तेंडुलकर (एक्स्प्रेस फोटो)
-
'क्रिकेटर' या हिंदी सिनेमाच्या सेटवर अभिनेत्री दिप्ती नवलसोबत क्रिकेट स्टार कपिल देव. (एक्स्प्रेस फोटो)
-
बॉबी देओल आणि कपिल देव (एक्स्प्रेस फोटो)
-
टीव्हीवरही कपिल देव यांनी 'सीआयडी' मालिकेत छोटेखानी भूमिका साकारली होती. (एक्स्प्रेस फोटो)
-
'इक्बाल' सिनेमाच्या सेटवर कपिल देव यांनी अभिनेते नसरुद्दीन शहा आणि अभिनेता श्रेयस तळपदेसोबत स्क्रिन शेअर केली होती
-
'आय एम स्पिरीट २०१०' च्या उदघाटन समारंभात अभिनेत्री सुष्मिता सेनसोबत कपिल देव

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल