-
अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांच्या आयुष्यात लवकरच एका नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. सध्या हे दोघंही फार आनंदात असून, उर्मिलाच्या 'बेबीमून'साठी त्यांनी नुकतीच पेंच अभयारण्याला भेट दिली. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
यावेळी जंगल सफारीचा आनंद घेत उर्मिला आणि आदिनाथने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटोही पोस्ट केले. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
या फोटोंमध्ये उर्मिला- आदिनाथ जंगल सफारीचा आनंद घेत असून, चक्क त्यांना 'जंगलबुक'मधल्या 'मोगली'नेही साथ दिली होती. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
थक्क होण्याचे कारण, नाही कारण उर्मिलानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन 'मोगली'च्या पुतळ्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला. त्यामुळे एका अर्थी मोगलीनेही या दोघांना जंगल सफरीत साथ दिली असे म्हणायला हरकत नाही. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
आदिनाथ- उर्मिलाने या जंगल सफरीत विविध प्राणीही पाहिले असून, त्याचेही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यामुळे चाहत्यांनाही पेंच अभयारण्याची एक झलक पाहण्याची संधी मिळाली. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
(छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

“सनी देओल माझ्या आयुष्यातील सर्वात काळा अध्याय, देव सगळं बघतोय, न्याय होईल”