-
धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती आणि इशान खत्तर, जान्हवी कपूर या नवकलाकारांची मुख्य भूमिका असलेल्या आगामी 'धडक' चित्रपटाचे सध्या जयपूर येथे चित्रीकरण सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. या पोस्टर्सनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यश मिळवले असले तरी ट्विटरकरांनी मात्र करणवर घराणेशाहीचा आरोप केल्याचे पाहायला मिळाले.
-
'सैराट' चित्रपटाचा रिमेक असलेला 'धडक' हा प्रेमकथेवर आधारित आहे.
-
'धडक'ने जान्हवी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून, इशानने मजिद मजिदीच्या 'बियॉन्ड द क्लाउड्स'ने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले.
-
शशांक खैतान दिग्दर्शित 'धडक' चित्रपट पुढील वर्षी ६ जुलैला प्रदर्शित होईल.
-
काही दिवसांपूर्वी 'धडक'ची टीम उदयपूर येथे चित्रीकरण करत होती.
-
जान्हवी ही श्रीदेवीची मुलगी असून इशान हा शाहिद कपूरचा भाऊ आहे.

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक