-
टेलिव्हिजनवरील बहुचर्चित ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोच्या रविवारी रंगलेल्या अंतिम फेरीत शिल्पा शिंदे हिने बाजी मारली. तर विजयाची प्रबळ दावेदार असणाऱ्या हिना खानला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. गेल्या काही दिवसांमध्ये हिनाची शोमधील लोकप्रियता वाढली होती. मात्र, अंतिम फेरीत शिल्पा माँ उर्फ शिल्पा शिंदे हिने तिच्यावर सरशी साधली.
-
हिना खान- लव्ह त्यागी आणि प्रियांक शर्मा या त्रिकुटाच्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले.
-
शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ताने 'मै तेरी दुश्मन' आणि 'इमोशनल अत्याचार' या गाण्यांवर सादरीकरण केले.
-
अक्षय कुमारने यावेळी सलमानला सॅनिटरी पॅड कसा तयार करावा याचे प्रशिक्षण दिले.
-
अक्षयने सपना चौधरीसोतब 'मुझसे शादी करोगी' गाण्यावर डान्स केला.
-
अक्षय, सलमान आणि ढिंच्यॅक पूजा
-
आपल्या आगामी 'पॅडमॅन' चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता अक्षयने बिग बॉस ११च्या अंतिम सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
-
पुनीश आणि बंदगीने 'टिप टिप बरसा पानी' गाण्यावर डान्स केला.
-
बिग बॉस ११च्या अंतिम सोहळ्यामध्ये ग्लॅमर आणि मनोरंजनाचा पुरेपूर भरणा होता.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनास पोलिसांची परवानगी, पण मराठा आंदोलकांसमोर ठेवल्या तीन मोठ्या अटी