-
महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार स्वप्नील जोशीला नुकताच पुत्ररत्न झाला. २६ जानेवारीला लहानग्या कृष्णाचे नाव 'राघव' ठेवण्यात आले. जोशींच्या नंदनवनात 'राघव'चे स्वागत अगदी थाटामाटात झाले. पहा सुपरस्टार बाबांच्या कुशीतील गोंडस 'राघव'चे फोटो…
-
स्वप्नील आणि लीना १६ डिसेंबर २०११ ला विवाहबंधनात अडकले. त्यांना मायरा ही दीड वर्षांची मुलगी आहे. मायराचा जन्म २३ मे २०१६ झाला. आता राघवच्या येण्याने स्वप्निल- लीनाचे चौकटी कुटुंब पूर्ण झाले असेच म्हणावे लागेल.
-
विशेष म्हणजे या चिमुकल्याच्या आगमनाच्या आदल्या दिवशीच स्वप्नीलच्या आईचा वाढदिवस असल्याने जोशी कुटुंबीयांचा आनंद द्विगुणीत झाला.
-
सध्या स्वप्नील आणि लीनावर सोशल मीडियामार्फत शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. इंडस्ट्रीतील
-
अनेक मित्र-मैत्रीणीही या चिमुकल्याला पाहायला स्वप्नीलच्या घरी आवर्जुन भेट देत आहेत.

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक