-
दीपिका पदुकोण ही केवळ प्रतिभावानच नाही तर बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकीही ती एक आहे. ती नेहमीच तिच्या स्टाइलने सर्वांचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरते. मग ती साडी असो वा ड्रेस, गाउन किंवा कॅज्युअल वेअर असो. कोणत्याही पोशाखात ती अगदी सहजपण वावरताना दिसते. साडीमध्ये तर सौंदर्याची खाण असणारी ही रुपवती अधिकच खुलून दिसते.
-
प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीने नुकतेच दीपिकाचे काही फोटो त्याच्या सोशल अकाऊंटवर शेअर केले. या फोटोंमधील दीपिकाच्या सौंदर्याचे वर्णन शब्दात करणे कठीण आहेच पण त्याचसोबत तिचे डोळे जणू आपल्यावर जादूच करत असल्याचा भास होतो.
-
दीपिकाचा आनंद सध्या गगनात मावत नाहीये. नुकताच प्रदर्शित झालेला तिचा पद्मावत चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्याही भूमिका आहेत.
-
राणी पद्मिनीच्या भूमिकेतील दीपिकाने अनेकांना घायाळ केले आहे. राणी पद्मावतीच्या भूमिकेला या अभिनेत्रीने न्याय दिला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
-
राणी पद्मावतीच्या भूमिकेसाठी मी बरीच मेहनत घेतल्याचे दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले. तसेच, चित्रपटातील पुरुष कलाकारांपेक्षा आपल्याला अधिक मानधन मिळावे यासाठी आग्रह धरल्याचेही ती म्हणाली.
-
'पद्मावत' प्रदर्शित होण्यासाठी मला संपूर्ण आयुष्य वाट पाहावी लागली असती तरी मी थांबले असते कारण एक नागरिक म्हणून हा माझा अधिकार आहे, असे दीपिकाने एका मुलाखतीत म्हटले.
-
बॉक्स ऑफिसवर ‘पद्मावत’ची घोडदौड सुरु असून, चित्रपटाने २०० कोटींचा गल्ला पार केला आहे.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल