-
नेहमीच्या व्यग्र कामाकाजातून थोडा ब्रेक प्रत्येकालाच हवा असतो. मग यात बॉलिवूड सेलिब्रिटी तरी अपवाद कसे ठरणार? शूटिंग आणि इतर कामातून वेळ काढत प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, कतरिना कैफ, करण जोहर यांसारखे सेलिब्रिटी सध्या व्हेकेशनचा आनंद घेत आहेत. (छाया सौजन्य: सोशल मीडिया)
-
आगामी 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटासाठी आलिया भट्ट बरीच मेहनत घेत आहे. मात्र, आऊटडोअर शूटिंगदरम्यानही स्वत:साठी थोडा वेळ काढायला ती विसरली नाही. बल्गेरियामधील सोफिया येथे चित्रपटाची शूटिंग सुरू असून त्यादरम्यान टिपलेली ही काही छायाचित्रे. (छाया सौजन्य: सोशल मीडिया)
-
कतरिना कैफने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये नि:शब्द सूर्यास्त आणि समुद्रकिनारा पाहायला मिळत आहे. (छाया सौजन्य: सोशल मीडिया)
-
'पद्मावत'नंतर शाहिद कपूर त्याच्या आगामी 'बत्ती गुल मीटर चालू' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. उत्तराखंडमध्ये सध्या त्याचे शूटिंग होत असून फावल्या वेळेत शाहिदसुद्धा उत्तराखंडची सफर करत आहे. (छाया सौजन्य: सोशल मीडिया)
-
श्रद्धा कपूरसुद्धा उत्तराखंडमध्येच असून तेहरी येथील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (छाया सौजन्य: सोशल मीडिया)
-
निर्माता- दिग्दर्शक करण जोहर सध्या बर्लिनमध्ये आहे. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी तो तेथे पोहोचला आहे. (छाया सौजन्य: सोशल मीडिया)
-
फरहान अख्तर मित्रांसोबत गेल्या काही दिवसांपासून गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. (छाया सौजन्य: सोशल मीडिया)

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”