-
अनुष्का शर्माच्या 'परी' या आगामी चित्रपटाच्या फर्स्ट लूकपासून ते अगदी नुकत्याच आलेल्या त्याच्या टीझरपर्यंत प्रत्येक वेळी प्रेक्षकांनी वेगळ्या रुपातील अनुष्का पाहिली आहे.
-
'क्लिन स्लेट फिल्म्स'ची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटातून अनुष्का एका आव्हानात्मक भूमिकेत दिसत असून, तिच्या या भूमिकेविषयी कलाविश्वात चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.
-
भयपटाला एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवण्यासाठी दिग्दर्शक प्रसित रॉय आणि 'परी'च्या संपूर्ण टीमने बरीच मेहनत घेतली आहे.
-
आतापर्यंत बॉलिवूडमध्ये बरेच भयपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. पण, 'परी'च्या निमित्ताने भीतीचा एक वेगळा चेहरा प्रेक्षकांसमोर आला आहे हे खरं.
-
या चित्रपटात अनुष्काचं अभिनय कौशल्यही पणाला लागल्याचं पाहायला मिळत आहे.
-
तेव्हा आता तिने साकारलेली ही भूमिका प्रेक्षकांची मनं जिंकणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Raj Thackeray : “६ जुलैला मुंबईत मोर्चा, त्यात एकही झेंडा…”, राज ठाकरेंनी केलं जाहीर; मराठीच्या मुद्द्यावर म्हणाले, “सरकारला एकदा कळू देत की…”