सौंदर्य, अभिनय आणि नृत्याविष्काराने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी आकस्मिक निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने दुबईत त्यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. -
श्रीदेवीचा जन्म तामिळनाडूतील शिवकाशी या ठिकाणी झाला. तिचे वडील पेशाने वकील होते.
-
बालकलाकार म्हणून श्रीदेवीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तमिळ चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली. यात तिने मुरुगन ही देवाची भूमिका साकारली होती.
-
ज्युली या हिंदी सिनेमातही श्रीदेवीच झलक दिसली होती. पण ती या सिनेमात मुख्य भूमिकेत नव्हती. पुढे ९० च्या दशकात मात्र तिने हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवली.
-
सोलवा सावन या चित्रपटातून श्रीदेवीने १९७८-७९ च्या दरम्यान हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर १९९७ पर्यंत पुढची १८-१९ वर्षे ती हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवत राहिली.
-
‘चालबाज’ हा सिनेमा हेमा मालिनी यांच्या सीता और गीता सिनेमाचा रिमेक होता. मात्र तो रिमेक आहे हे विसरायला लावले ते श्रीदेवीने.
-
‘हिम्मतवाला’ या सिनेमात तिने जितेंद्र सोबत काम केले. या सिनेमातले ‘ताथय्या ताथय्या’ गाणेही चांगलेच हिट झाले. आजही त्या गाण्याच्या ओळी लोकांच्या ओठांवर आहेत.
-
श्रीदेवी यांना हिंदी, तमिळ,तेलुगू भाषांतील चित्रपटातील भूमिकांसाठी सहा वेळा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
-
निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर 'जुदाई' चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या.
-
२०१२ साली आलेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन केले. सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी श्रीदेवी यांना २०१३ साली 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

माजी आमदार चोथेंनी चार दशकांची शिवसेनेची साथ सोडली