-
बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्व शोकसागरात बुडालं आहे. बराच काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रीची अशी अकाली एक्झिट अनेकांच्याच मनाला चटका लावून गेली. दुबईमध्ये एका कौटुंबिक समारंभासाठी गेल्या असत्या कार्डीअॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं. श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या आणि अनिल कपूर यांच्या घरची वाट धरत या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केल्याचं पाहायला मिळालं. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
निर्माता- दिग्दर्शक करण जोहरने अनिल कपूर यांची भेट घेतली. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
करणसोबतच सेलिब्रिटी फॅशन डिझायनर आणि श्रीदेवी यांचा खूप चांगला मित्र मनिष मल्होत्रासुद्धा यावेळी उपस्थित होता. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
श्रीदेवी यांच्या मुलींचे सांत्वन करण्यासाठी अभिनेता अर्जुन कपूरसुद्धा आला होता. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
बऱ्याच चित्रपटांमध्ये श्रीदेवी यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अनिल कपूर यांचीही कलाकारांनी भेट घेतली. अनिल श्रीदेवीचे दीरही आहेत. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
ज्येष्ठ अभिनेत्री रेखाही या दु:खाच्या प्रसंगी कपूर कुटुंबियांसोबत होत्या. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
कलाविश्वाशी श्रीदेवी यांचं नातं पाहता त्यांच्या कलाकार मित्रांवर हा आघातच झाला आहे. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
अभिनेत्री राणी मुखर्जी. (छाया सौजन्य- Varinder Chawla)

Honeymoon Couple : मधुचंद्रासाठी शिलाँगला जाऊन बेपत्ता झालेल्या जोडप्यापैकी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला, त्याच्या पत्नीचा शोध सुरु