राजकारणात प्रवेश केल्यानंतर सुपरस्टार रजनीकांत सध्या आध्यात्मिक यात्रेवर आहेत. दरवर्षी ते हिमालयात आध्यात्मिक यात्रेवर जातात, मात्र यावेळी पहिल्यांदाच त्यांच्या या यात्रेचे फोटो समोर आले आहेत. त्यांच्या या हिमालयवारीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (छाया- रियाज अहमद) हिमालयवारीवर जाण्यापूर्वी रजनीकांत यांनी चेन्नई विमान विमानतळावर पत्रकारांशी बातचित केली होती. त्यावेळी आपली ही यात्रा किमान १५ दिवसांची असेल, असं त्यांनी म्हटलं होतं. (छाया- रियाज अहमद) नुकतंच रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांचा हा पहिलाच हिमालय दौरा आहे. (छाया- रियाज अहमद) जवळपास मागील दहा वर्षांपासून रजनीकांत आध्यात्मिक यात्रेवर हिमालयात जातात. (छाया- रियाज अहमद) रजनीकांत आपल्या जीवनातील किंवा कारकिर्दीबद्दल काही महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी हिमालयाच्या दौऱ्यावर जातात. तर प्रत्येक चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्यानंतरही हिमालयाच्या दौऱ्यावर जाण्याचा जणू त्यांनी एक नियमच केला आहे. (छाया- रियाज अहमद) रजनीकांत यांचे दोन चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. 'काला' हा चित्रपट २७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. तर '२.०' या चित्रपटाची तारीख अद्याप गुलदस्त्यात आहे. या चित्रपटात अक्षय कुमारही झळकणार आहे. (छाया- रियाज अहमद)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली