-
कॉमेडी शोमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवणारा, प्राईम टाईममध्ये मालिकांना टक्कर देणारा विनोदवीर कपिल शर्माचा याचा आज वाढदिवस आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कपिल ११ वर्षांपूर्वी अमृतसरहून मुंबईला आला.
-
'
-
अप्रतिम विनोदबुद्धी आणि हजरजबाबीपणा यांच्या जोरावर कपिलने २००७ मध्ये 'ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' हा शो जिंकला आणि कॉमेडी किंग म्हणून ओळखू लागला.
-
'द कपिल शर्मा शो'च्या माध्यमातून तो प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. पण नंतर सहकलाकारांशी झालेल्या वादामुळे कपिल चर्चेत आला. त्यानंतर सेलिब्रिटींचे शूटिंग वारंवार रद्द केल्यामुळे वाहिनीने त्याला काही काळ ब्रेक देण्याचा निर्णय घेतला.
-
'फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा' या नव्या शोसह आता कपिलने त्याच्या करिअरची दुसरी इनिंग सुरू केली आहे. प्रेक्षकांना पुन्हा एकदा खळखळून हसवण्यासाठी तो सज्ज झाला आहे. मात्र, या नव्या शोमध्ये त्याचे काही जुने सहकलाकार मात्र त्याच्यासोबत नाहीत.

नवरात्रीचा उपवास कधी सोडावा? नेमकी तारीख, शुभ वेळ आणि पद्धत जाणून घ्या…