-
सेलिब्रिटींना भेटण्याची, त्यांना समोरासमोरुन पाहण्याची अनेकांचीच इच्छा असते. पण, सर्वच चाहत्यांच्या आयुष्यात तो योग येतोच असं नाही. अशा चाहत्यांसाठी आपल्या आवडत्या सेलिब्रिटीशी निगडीत काही गोष्टी अतिशय मोलाच्या ठरुन जातात. याच मोलाच्या गोष्टींच्या यादीत येतं ते म्हणजे मादाम तुसाँ वॅक्स म्युझियम. मेणाचा सुरेख वापर करत त्याच्या माध्यमातून कलेचा अद्वितीय नमुना सादर करत दिल्लीच्या मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये सेलिब्रिटींच्या हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सुरु झालेल्या या संग्रहालयामध्ये आता सेलिब्रिटींच्या पुतळ्यांची संख्या वाढली असून, प्रत्येक सेलिब्रिटीची प्रतिकृती पाहताना त्यात टीपण्यात आलेले बारकावे लगेचच लक्षात येत आहेत.
-
सलमान खानचा हा मेणाचा पुतळा संग्रहालयात प्रवेश करताच नजरेस पडतो.
-
फक्त बॉलिवूडच नव्हे, तर टॉम क्रुझ आणि मर्लिन मन्रो या हॉलिवूड सेलिब्रिटींचे पुतळेही या संग्रहालयात साकारण्यात आले आहेत.
-
शो मॅन राज कपूर आणि त्यांचा नातू अभिनेता रणबीर कपूर यांचे पुतळे अनेकांचच लक्ष वेधत आहेत.
-
विनोदवीर कपिल शर्मा आणि अभिनेता अनिल कपूर यांचे पुतळे त्यांच्या 'सिग्नेचर पोझ'मध्ये साकारण्यात आले आहेत.
-
सौंदर्याचा अनमोल नजराणा म्हणजेच अभिनेत्री मधुबाला यांच्या पुतळ्याकडे पाहतच राहावं, इतके बारकावे टीपण्यात आले आहेत. त्यासोबतच गायिका श्रेया घोषालचाही पुतळा या संग्रहालयात पाहायला मिळतो.
-
रणबीर आणि मायकल जॅक्सन यांच्या पुतळ्यामध्ये एक गोष्ट लगेचच लक्षात येते. ती म्हणजे या दोघांचा अनोखा अंदाज.
-
ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाणारी लेडी गागा यांचे पुतळेही मोठ्या कलात्मकतेने साकारण्यात आले आहेत.
-
सेलिब्रिटींचे पुतळे ज्या पद्धतीने ठेवण्यात आले आहेत, ते पाहता आपण कोणा एका कार्यक्रमात असल्याची अनुभूती होते.
-
अभिनेत्री स्कर्लेट जॉन्सन आणि 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित यांचं सौंदर्य मेणाच्या पुतळ्यातूनही अबाधित राहिलं आहे.
-
बिग बी अमिताभ बच्चन
-
किंग खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान

अमेरिकेने भारतावर ५० टक्के कर लादले, सोन्याच्या दरावर ‘हा’ परिणाम; सराफा व्यावसायिक म्हणतात…