-
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे नाव घेताच मन स्वरांमध्ये भिजून जाते. त्यांच्या या जादुई स्वरांचे नेमके रहस्य काय?
-
त्या कशा प्रकारे रियाज करायच्या, अशा प्रकारचं कुतूहल संगीत प्रेमींच्या मनी कायम असतं. याचा उलगडा एका सुरेख अशा प्रदर्शनातून चाहत्यांना अनुभवता येणार आहे.
-
या प्रदर्शनाच्या माध्यमातून चाहत्यांना गानसरस्वतीच्या भावमुद्रा पाहण्याची संधी मिळणार आहे.
-
हे प्रदर्शन ५ ते १० एप्रिल २०१८ दरम्यान सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत जहांगीर कलादालन येथे आयोजित करण्यात आलं आहे.
-
प्रदर्शन पाहण्यासाठी सर्वांना विनामुल्य प्रवेश आहे.

Suryakumar Yadav: मानलं राव सूर्या दादाला! सामना जिंकल्यानंतर केली मन जिंकणारी कृती; पाहा video